Marathi News> टेक
Advertisement

Maruti ने परत मागवल्या Swift आणि Baleno कार...

कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का 

Maruti ने परत मागवल्या Swift आणि Baleno कार...

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकी इंडियाने आपल्या स्विफ्ट आणि बलीनो या कार पुन्हा परत मागवल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक वेक्यूममध्ये असलेल्या खराबीमुळे जवळपास 52,686 कार पुन्हा मागवल्या आहेत. मीडिया रिपोर्टुसार, ज्या कार पुन्हा मागवल्या आहेत त्यांचे उत्पादन 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018 या कालावधीत कारचं उत्पादन झालं आहे. या कारच्या मारूती सुझुकीने 'सर्व्हिस कॅम्पेन' च्या अंतर्गत हे सुरू केलं आहे. 

फ्रीमध्ये रिप्लेस केली जाणार कार 

जर कारमध्ये ब्रेक बूस्टर्समध्ये जर खराबी असल्यास कंपनीमार्फत याची फ्री तपासणी केली जाणार आहे. 14 मे 2018 मध्ये हे सुरू केलं आहे. एवढंच नाही कारमध्ये ब्रेक बूस्टर्स खराब होत असलेल्या ग्राहक कोणताही चार्ज घेतले जाणार आहेत. 

आपली कारची अशी करा तपासणी 

जर तुम्ही देखील नवी स्विफ्ट किंवा बलीनो विकत घेतली असेल तर ती लवकरच चेक करून घ्या. तुम्ही या लिंकवर क्लिक करून तपासणी करू शकता. यामध्ये MBH लिहून 14 डिजिटलचा अल्फा न्यूमरिक चेसिस नंबर टाइप करा. नंतर चेकवर क्लिकर करा आणि आपल्या कारच्या आयडी प्लेसवर हा लिहिलेला नंबर असेल. 

 

Read More