Marathi News> टेक
Advertisement

मारुतीची ७ सीटर 'वॅगन आर' लवकरच होतेय लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

'वॅगन-आर' ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते

मारुतीची ७ सीटर 'वॅगन आर' लवकरच होतेय लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

मुंबई : मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय 'वॅगन-आर' नव्या स्वरुपात भारतात दाखल होतेय. नवी 'वॅगन-आर' जुन्या वॅगन-आरच्या मॉडेलपासून बरीच वेगळी आहे. यामध्ये अगोदरपेक्षा जास्त स्पेस आणि दमदार इंजिन असेल. 'वॅगन-आर'चं ७ सीटर मॉडेल यावर्षी सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्याच्या 'वॅगन-आर'मध्ये केवळ ५ जणांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. नव्या 'वॅगन-आर'मध्ये १.२ लीटरचं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८४ bhpच्या पॉवरसोबत ११५nm टॉर्क जनरेट करतं. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) दोन्ही ऑप्शन्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असेल. कंपनी नव्या 'वॅगन-आर'सोबत सीएनजी ऑप्शन देण्याचाही विचार करू शकते. 

'वॅगन-आर' ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारचे तीन वेरिएंट R बेस, R टॉप आणि R सीएनजी असू शकतात.

या कारची सुरुवातीची किंमत ५.२ लाख रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये R बेसची एक्स शोरुम किंमत ५.२ लाख रुपये, R टॉपची ६.५ लाख आणि R सीएनजीची किंमत ६.३ लाख रुपये असू शकेल.

कारमध्ये की लेस एन्ट्रीसोबतच सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युएल टोन डॅशबोर्ड, ब्लूटूथसोबत डबल टिन स्टिरिओ, प्रीमिअम सीट फॅब्रिकसोबत रिअर पॉवर विंडो... या गाडीचं फ्रंट आणि बॅक दिसण्यासाठी जुन्या वॅगन आरसारखंच आहे. सध्याच्या गाडीपेक्षा ही गाडी लांबलचक असेल. यामध्ये १४ इंच अलॉय व्हिल, रेग्युलर हॅलोजन हेडलॅम्पस आणि रुफ रेल्स असे फिचर्स असतील. नव्या गाडीत तीन रांगेत बसण्याची 

'वॅगन-आर'च्या ७ सीटर कारची स्पर्धा असेल ती डॅटसन गो प्लस आणि रेनॉच्या कॉम्पॅक्ट एमपीव्हीसोबत... 

Read More