Marathi News> टेक
Advertisement

Maruti ची पहिली EV बजेटही सांभाळणार अन् पर्यावरणही; कधी लाँच होणार, कधी खरेदी करता येणार? पाहा Updates

Maruti EV Car : गेल्या काही वर्षांमध्ये इव्ही कार अर्थात इलेक्ट्रीक कारला अनेकांचीच पसंती मिळाली असून, अनेक कंपन्या आता या क्षेत्रात उडी घेत आहेत. 

Maruti ची पहिली EV बजेटही सांभाळणार अन् पर्यावरणही; कधी लाँच होणार, कधी खरेदी करता येणार? पाहा Updates

Maruti EV Car : देशातील दिग्गज आणि कैक वर्षांपासून ऑटो क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या मारुती सुझूकी कंपनीकडून आता आणखी काही नवनवीन संकल्पनांच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे कंपनीची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार. 

Zee Business शी संवाद साधनाता मारुतीकडून देण्यात आलेल्या Exclusive माहितीनुसार कंपनीची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये लाँच होणार आहे. कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग हेड पार्थो बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी 2025 मध्ये जानेवारी महिन्यातच ही इलेक्ट्रीक कार लाँच केली जाणार आहे. इंफ्रास्ट्रक्चर आणि EV सॉल्यूशन्ससह ही कार लाँच होणार आहे. 

कार लाँच होण्याच्या संभाव्य तारखा... 

बॅनर्जी यांच्या माहितीनुसार साधारण 17 ते 22 जानेवारीदरम्यान मारुतीची कार लाँच होणार असून, या कारसह इलेक्ट्रिक व्हीकल इंफ्रास्ट्रक्चरही लाँच केलं जाणार आहे. सध्या कंपनीकडून या कारसाठीची तयारी पूर्ण झाली असून, ही कार 500 किमीहून अधिक रेंज देणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण इकोसिस्टीमसोबत ही कार लाँच केली जाणार आहे. 

हेसुद्धा वाचा : क्रेडिट कार्ड, UPI पेमेंटवर खरंच 18% GST लागणार का? जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मारुतीचे मॉडेल आणि ग्राहकांचं प्राधान्य 

सणासुदीच्या दिवसांमध्ये मारुतीच्या विविध कारना ग्राहकांची पसंती मिळत असून, कंपनीकडूनही ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. ज्यामुळं कार आणि सोबत मिळणाऱ्या या सवलतींमुळं कारप्रेमीसुद्धा मारुतिलाच पसंती देताना दिसत आहेत. कंपनीकडून स्क्रॅप पॉलिसीला प्राधान्यस्थानी ठेवत त्यातही ग्राहकांना सवलत दिली जात आहे. 15 वर्षे किंवा त्याहून जुनी कार र्यावरणासह उतर वाहनांसाठी नुकसानदायी ठरू शकते असं सांगत बॅनर्जी यांनी ही स्क्रॅप पॉलिसी उजेडात आणली. 

येत्या काळात ग्राहकांची आर्थिक क्षमता लक्षात घेता कंपनीकडून ईव्ही कारचे सिंगल आणि ड्युअल मोटर असे व्हेरिएंट लाँच केले जाणार आहेत. बेसिक कार फिचरसह दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणारे फिचर या कारची जमेची बाजू असेल. 

Read More