Marathi News> टेक
Advertisement

याला म्हणतात नशीब... ऑर्डर केला iPhone 13 आणि घरी पोहोचला iPhone 14

पठ्ठ्याचं नशीबच चमकलं,  तुम्हाला मिळालया का कधी iPhone 13  च्या ऐवजी iPhone 14  

याला म्हणतात नशीब... ऑर्डर केला iPhone 13  आणि घरी पोहोचला iPhone 14

Flipkart Sale :   सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्स सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर धमाकेदार सूट मिळत आहे. सध्या फ्लिपकार्टवर (Flipkart) 'बिग बिलियन डेज' (Big Billion Days Sale) सेल सुरू झाला होता, जो आता संपला आहे. या विक्रीत अत्यंत कमी किमतीत वस्तूंची विक्री करण्यात आली.  परंतु विक्रीदरम्यान, अशा अनेक प्रकरणं देखील समोर आली आहेत ज्यात लोकांना खरेदी केलेल्या मालाच्या जागी चुकीचा माल मिळाला आहे. (Flipkart Big Billion Days Sale)

नुकताच एका व्यक्तीने आयफोन ऑर्डर केला आणि बॉक्समध्ये साबण सापडला. पण यामध्ये काही लोकांचं तर नशीबच चमकलं...  एका व्यक्तीने 'बिग बिलियन डेज' सेलमधूल आयफोन 13 (IPhone 13) ऑर्डर केला, परंतु त्याच्या घरी आयफोन 14 (IPhone 14)  पोहोचला. जाणून घेऊया प्रकरण...

ट्विटरवर एका व्यक्तीने दोन फोटो शेअर केले आणि सांगितलं की, त्याच्या फॉलोअरला 50 हजारा रुपयांमध्ये iPhone 13 ऐवजी iPhone 14 कसा मिळाला? अश्विन हेगडे नावाच्या ट्विटर युजरने दोन फोटो शेअर केले आहेत. एकामध्ये फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेल्या iPhone 13 बद्दल माहिती होती, तर दुसऱ्या फोटोमध्ये  iPhone 14 चा बॉक्स होता.  (Flipkart IPhone 13)

अश्विन हेगडेने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या एका फॉलोअरने फ्लिपकार्टवरून आयफोन 13 ऑर्डर केला पण त्याला 13 ऐवजी आयफोन 14 मिळाला.' अश्विवचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (phone 13 On Flipkart)

अवघ्या दोन दिवसांत या ट्विटला 8,000 हून अधिक लाईक्स आणि 400 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. काही लोक फ्लिपकार्टची खिल्ली उडवत आहेत. तर काही लोक म्हणतात की ज्या व्यक्तीला आयफोन 14 मिळाला आहे त्याने तीच ऑर्डर घ्यावी जी त्याने खरेदी केली आहे. (Flipkart Delivers IPhone 14 To Customer Who Ordered IPhone 13)

Read More