Marathi News> टेक
Advertisement

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

फेसबूक अकाउंटवर ब्लू टीक (Facebook Verified Badge) मिळवण्यासाठीचे काही निकष आहेत.

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

Facebook Account Verified Badge : सोशल मीडियावर अकाउंट्स व्हेरिफाय करुन घेण्याचं सध्या पेव फुटलंय. प्रत्येक जण आपलं फेसूबक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करुन ब्लू टीक मिळवत आहे. ही ब्लू टीक यूझर्सच्या नावापुढे दिसते. ब्लू टीक संबंधित अकाउंट हे अधिकृत असल्याचं प्रमाण आहे. ब्लू टीक असलेल्या सोशल मीडिया अकाउंटची किंमत सर्वसाधारण अकाउंटपेक्षा अधिक असते. ब्लू टीक मिळवण्यासाठी तुम्हीही अप्लाय करु शकता. तुमच्या स्वत:चं सोशल मीडिया अकाउंट कसं व्हेरिफाय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (know step by step how to given faceook account or page blue tick)

फेसबूक अकाउंट व्हेरिफाय कसं करायचं? (Facebook Verified Badge)

फेसबूक अकाउंटवर ब्लू टीक मिळवण्यासाठीचे काही निकष आहेत. संबंधित अकाउंट अथवा पेज ऑथेंटिक असायला हवं.  तसेच प्रोफाइल परिपूर्ण असायला हवं. अवाउट सेक्शन पूर्ण असायलं हवं. प्रोफाईल किंवा पेज हे नोटेबल असायला हवं. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्यांनाच फेसबूक ब्लू टीक देतं. 

अप्लाय कसा करायचा? 

फेसबूक व्हेरिफाइड करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.

लिंकवर क्लिक केल्यानंतर अनेक ऑप्शन समोर येतील. सर्वात आधी फेसबूत पेज किंवा प्रोफाईल व्हेरिफाय करायचीय याची सहमती द्यावी लागेल. 

त्यानंतर किमान एक डॉक्यूमेंट सिलेक्ट करुन त्याची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल. 

त्यानंतर कॅटेगरीत प्रोफाईलनुसार एक पर्याय निवडावा लागेल.   

देशाचं नाव निवडावं लागेल. 

त्यानंतर ऑडिशन हा पर्याय निवडा. याशिवाय तुम्हाला फेसबूकच्या 5 लेखांची लिंक सबमिट करावी लागेल. 

सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर सेंड बटणवर क्लिक करा. अशाप्रकारे ब्लू टीकसाठी अर्ज पूर्ण होईल. 

Read More