Marathi News> टेक
Advertisement

Jio चा वापर करताय मग ही 5 कामे करणं विसरू नका...

रिलायन्स जिओ सतत आपले नवे प्लान लाँच करत असते. 

Jio चा वापर करताय मग ही 5 कामे करणं विसरू नका...

मुंबई : रिलायन्स जिओ सतत आपले नवे प्लान लाँच करत असते. 

प्रत्येक प्लानमध्ये युझर्सला इंटरनेटचा भरपूर वापर करण्याची संधी जिओ देत आहे. जिओ युझर्स दररोज 1 जीबी डेटा वापरू शकतो. मात्र काही युझर्स 1 जीबी डेटा वापरू शकत नाही. तर काही युझर्स व्हॉट्सअॅप, फेसबुक, व्हिडिओ कॉलिंग, मुव्ही आणि व्हिडिओ डाऊनलोड करून संपूर्ण डेटा वापरून टाकतात. मात्र काही काम इतकी आवश्यक असूनही ती करणं विसरून जातात. 

त्यामुळे जर तुम्ही जदेखील जिओचं सिम वापरत असाल तर ही काम सर्वात अगोदर करून घ्या. जाणून घेऊया अशी कोणती 5 काम आहे जी युझर्सला करायला हवं. 

1) स्मार्टफोन अपडेशन 

रिलायन्स जिओ सिमवर 4 जी इंटरनेट स्पीड मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करायला हवं. 

2) अॅप अपडेशन 

फेसबुक, व्हॉट्सअॅप, मॅसेंजर आणि गुगल अॅप्सला अपडेट करायला पाहिज. अपडेशनने नवे फिचर्स अॅड होत असतात. 

3) क्लाऊड स्टोरेज 

स्मार्टफोनमध्ये स्पेस कमी असते. त्यामुळे व्हिडिओ किंवा फुटेजला क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव करून घेतलं पाहिजे. युझर्स जेथून सगळा डेटा रिकवर करू शकतात. 

4) डिवाइस अपडेशन 

मुव्ही आणि व्हिडिओ डाऊनलोडसोबतच जिओ 4 जी सिममधून लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट यासारखे डिवाइसच्या सॉफ्टवेअरला अपडेट करू शकता. 

5) राहिलेल्या मालिका बघा 

जर तुमच्या आवडीच्या गोष्टी व्हिडिओ किंवा सिरियल्स पाहायच्या राहिल्या असतील तर हे व्हिडिओ युट्यूबमार्फत पाहू शकता. 4 जी स्पीड असल्यामुळे बफरिंग न होता हा व्हिडिओ सरळ पाहू शकता. 

 

Read More