Marathi News> टेक
Advertisement

11 महिन्याची Validityअसणारा Jioचा बजेट प्लॅन, इंटरनेट आणि फ्री कॉलिंग

या योजनेत जियो सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अ‍ॅप्सवर विनामूल्य सबक्रीपशन देण्यात आलं आहे.

11 महिन्याची Validityअसणारा Jioचा बजेट प्लॅन, इंटरनेट आणि फ्री कॉलिंग

मुंबई: जर तुम्ही वारंवार Recharge करण्यापासून कंटाळले असाल तर Reliance Jio घेऊन आला आहे  11 महिन्यांचा भन्नाट  Recharge Plan तेही  फक्त  ७५० रुपयांमध्ये. या प्लानमध्ये फक्त वर्षभराची Validity चं नाही तर आणखीही विशेष बेनिफीट्स मिळणार आहे.  

रिलायन्स जिओ कायमचं नवनवीन प्रीपेड प्लान घेऊन येताना दिसते. पण यावेळी जिओ 336 दिवसांची वैधता असणारा एक नवीन प्लान लाँच केला आहे. ज्यात 750 रुपयांपेक्षा कमी किंमती 11महिन्यांची
 वैधता असणार आहे. रिलायन्स जिओच्या या नव्या प्लानमध्ये वापरकर्त्यांना 750 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 336 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या योजनेत वापरकर्ते 28 दिवसांच्या 12 साइकलपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

या प्लानमध्ये जियो  दरमहा 2 जीबी हाय-स्पीड डेटा देते आणि डेटाची मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड 64KBS वर सुरू राहणार आहे. तसेच या योजनेत कोणत्याही नेटवर्कवर  अमर्यादित कॉलिंगसह प्रत्येक सायकलमध्ये (28 दिवसांसाठी) 50 एसएमएस देखील दिले जातात. या योजनेत जियो सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अ‍ॅप्सवर विनामूल्य सबक्रीपशन देण्यात आलं आहे.

 या प्लानचा लाभ फक्त JioPhone वापरकर्ते घेऊ शकतात. Reliance Jio चा हा ११ महिन्यांचा भन्नाट  Recharge Plan मध्ये  असे विशेष बेनिफीट्स मिळणार आहेत.   

Read More