Marathi News> टेक
Advertisement

एका नव्या अंदाजाच लाँच होणार iPhone SE; पाहा कधी लाँच होणार चौथी सिरीज

Apple ने नुकतंच त्यांची iPhone 14 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता आयफोनचे चाहते पुढच्या फोनची आतुरतेने वाट पाहतायत.

एका नव्या अंदाजाच लाँच होणार iPhone SE; पाहा कधी लाँच होणार चौथी सिरीज

iPhone SE 4 : Apple ने नुकतंच त्यांची iPhone 14 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता आयफोनचे चाहते पुढच्या फोनची आतुरतेने वाट पाहतायत. अपकमिंग iPhone 15 आणि iPhone SE 4 च्या बाबतीत अफवा आणि लीक सुरु झाल्या आहेत. दरम्यान नुकत्या हाती आलेल्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 ची लाँच डेट, डिझाईन आणि इतर फीचरची माहिती समोर आली आहे.

कधी लाँच होणार iPhone SE 4 

नेक्स्ट जनरेशन iPhone SE म्हणजेच iPhone SE 4 2024 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय 2023 मध्ये अॅपल iPhone 15 सिरीज लॉन्च करणार असल्याची देखील चर्चा आहे.

iPhone SE 4 चं डिझाइन

iPhone SE 3 च्या तुलनेत iPhone SE 4 चं डिझाइन वेगळं असण्याची शक्यता आहे. iPhone SE थर्ड जनरेशन 4.7 इंच डिस्प्ले, जाड bezels आणि टच आयडी होम बटन असलेला एकमेव आयफोन आहे.

दरम्यान समोर आलेल्या अफवांनुसार, Apple iPhone SE 4 सह नवीन डिझाइनची योजना आखलीये. MacRumors मधील एका अहवालानुसार, Apple होम बटणाशिवाय, Apple च्या फ्लॅगशिप्सप्रमाणे फोन पूर्ण डिस्प्ले डिझाइनसह असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे iPhone SE 4 2018 iPhone XR सारखा दिसण्याची शक्यता आहे. 

iPhone SE 4 डिस्प्ले

iPhone SE 4 मध्ये iPhone SE 3 च्या तुलनेत मोठी स्क्रीन असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौथ्या सिरीजच्या iPhone SE ला 5.7 आणि 6.1-इंचाची स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.

Read More