Marathi News> टेक
Advertisement

Facebook वर Lock Profile पाहाण्यासाठी ही Trick वापरा, आणि कोणाचंही प्रोफाईल पाहा

लोकांच्या मनात अशी एक गोष्ट कायम राहाते की, एकदातरी त्या व्यक्तीचे प्रोफाइल पाहाता यावे.

Facebook वर Lock Profile पाहाण्यासाठी ही Trick वापरा, आणि कोणाचंही प्रोफाईल पाहा

मुंबई : तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की, फेसबुकवर लॉक ठेवतात. ज्यामुळे आपल्याला त्यांचा फोटो पाहाचता येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली, परंतु त्याचा प्रोफाईल लॉक असल्यामुळे तुम्हाला ते पाहाणे शक्य होत नाही. त्याच बरोबर जर तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट पाठवायची असेल तरी देखील समोरच्या व्यक्तीचा फोटो आपल्याला पाहाता येत नाही.

अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात अशी एक गोष्ट कायम राहाते की, एकदातरी त्या व्यक्तीचे प्रोफाइल पाहाता यावे. आता तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण तुमच्या या समस्येचे निराकरण एका छोट्या युक्तीमध्ये दडलेले आहे.

त्यामुळे आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही फेसबुकवर कोणाचेही लॉक केलेले प्रोफाइल पाहू शकाल.

लोकं फेसबुक प्रोफाईल लॉक का करता?

खरंतर, फेसबुकमध्ये डोकावणारी बरेच लोकं असतात. अशा लोकांपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी, फेसबुकने प्रोफाइल लॉकचे वैशिष्ट्य आणले आहे.

यामुळे चांगली गोष्ट अशी झाली की, जर तुम्ही तुमच्या फेसबुक आयडीसाठी प्रोफाईल लॉक केले, तर तुमच्या मित्रांशिवाय दुसरा वापरकर्ता तुमचे फोटो पाहू शकणार नाही. म्हणजे कोणतीही अज्ञात व्यक्ती आपली पोस्ट आणि इतर माहिती पाहू शकत नाही.

त्याच बरोबर या फीचरमुळे तुमच्या लॉक केलेल्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट देखील घेतला जाऊ शकणार नाही. हे गोपनीयतेपूर्ते ठिक आहे, परंतु समस्या तेव्हा येते जेव्हा आपल्याला लॉक केलेल्या प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेस्ट येते. ज्यामुळे आपल्याला प्रोफाईल बघता येत नाही, त्यामुळे आपण बऱ्याचदा लोकांची रिक्वेस्ट स्वीकारत नाही.

परंतु आता आम्ही काही मार्ग सांगणार आहे ज्याच्याद्वारे तुम्ही फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाईल पाहू शकणार आहे.

पहिला मार्ग

फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाईल पाहणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरील लॉक केलेल्या प्रोफाइलवर जा. त्यानंतर प्रोफाइल पिक्चरवर राईट क्लिक करा. आता Copy Image Address वर टॅप करा. एक नवीन विंडो उघडा आणि त्यात ती url पेस्ट करा. याद्वारे तुम्हाला लॉक केलेल्या प्रोफाइलचा पाहाता येईल.

दुसरा मार्ग

लॉक केलेल्या प्रोफाइलचे Username लक्षात ठेवा. आता 'http://graph.facebook.com/username/userid/picture?width=2000&height=2000' वर जा आणि यूजरनेमच्या ऐवजी तुम्हाला पाहिजे असलेले यूजरनेम टाका तुम्हाला लॉक केलेला प्रोफाइल पिक्चर दिसेल.

Read More