Marathi News> टेक
Advertisement

हुवावे कंपनीचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च

Huawei P Smart+ स्मार्टफोनचा रियर कॅमेरा खास वैशिष्टय आहे.

हुवावे कंपनीचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी 'हुवावे'ने Huawei P Smart+ लॉन्च केला आहे. Huawei P Smart+ ला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Huawei P Smart+ स्मार्टफोन स्टारलाइट ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. Huawei P Smart+ स्मार्टफोन लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

काय आहेत Huawei P Smart+ ची वैशिष्ट्ये -

- ६.२१ इंची फुल एचडी स्क्रीन
- ऑक्टाकोअर प्रोसेसर 
- ३४०० mAh बॅटरी बॅकअप
- ३ जीबी रॅम
- ६४ जीबी स्टोरेज
- २४ मेगापिक्सल + १६ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा
- ८ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
- अॅन्ड्राइड ९ pie

Huawei P Smart+ स्मार्टफोनचा रियर कॅमेरा खास वैशिष्टय आहे. प्रायमरी कॅमेरा २४ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फोटो क्लिअर आणि शार्प येण्यासाठी या कॅमेराचा वापर आहे. या कॅमेरासाठी कलर बॅलेन्सही उत्तम देण्यात आला आहे. २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तर अल्ट्रा वाईड अॅंगलसाठी तिसरा १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रन्ट कॅमेराला डिस्प्लेला वॉटर नॉचही देण्यात आला आहे. 

Read More