Marathi News> टेक
Advertisement

Electricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा

Electricity Bill : बिजली का बिल काम करने के करीके: भारतात हिवाळा काही दिवसांनी येईल आणि त्यानंतर हिटर आणि गीझरचा (Heaters and geysers) सर्वाधिक वापर केला जाईल. वीज बिलही त्यापेक्षा जास्त असेल. पण दोन गॅजेट्स बदलून तुम्ही वीज बिल कमी करू शकता...

Electricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा

How To Reduce Electricity Bills : भारतात हळूहळू उष्णता वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पंखा, एसीचा, कूलरचा वापर वाढेल. याचा सगळ्याचा परिणाम दिसेल तो म्हणजे विजेच्या बिलावर (Electricity Bills). आणि विजेचे बिल जास्त आले तर स्वाभाविकच आपल्यावरही थोडा ताण येतो. पण आता काळजी करु नका. या सोप्या टिप्सने तुमचे विजेचे बिल कमी करण्यास मदत करतील. आज आम्‍ही तुम्‍हाला वीज बिल कमी करण्‍याचे सोपे उपाय सांगणार आहोत (How To Reduce Electricity Bills)

असे हीटर वापरणे टाळावे

थंडीच्या दिवसात हीटरचा वापर सर्रास होतो. जर तुम्ही जास्त क्षमतेचा हीटर (Heater used) वापरत असाल तर ते लगेच काढून टाका. जास्त क्षमतेचे हिटर भरपूर वीज वापरतात आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसून येतो. हीटरऐवजी ब्लोअर वापरणे किफायतशीर आहे. ब्लोअर सुरक्षित आहे तसेच कमी वीज वापरतो.

जुन्या पद्धतीचा गिझर

आजही अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी रॉड्स किंवा जुन्या पद्धतीचे गिझर (Geyser used) वापरले जातात. या दोन्हीमध्ये वीजेचा जास्त वापर होतो. विजेचा जास्त वापर केल्यास बिलात वाढ होईल. म्हणूनच आजच रॉड आणि जुन्या पद्धतीच्या गिझरऐवजी अत्याधुनिक गिझर घरात आणा. तुमच्या नवीन गीझरला 5 स्टार रेटिंग असेल तर चांगले होईल. 5 स्टार रेटिंग असलेले गीझर कमी वीज वापरतात ज्यामुळे तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता.

सामान्य बल्बमुळे विजेचा वापर वाढतो

तुम्ही अजूनही जुने बल्ब (Old bulbs) वापरत असाल तर त्यांना लगेच काढून ठेवाय. हे बल्ब विजेचे बिल झपाट्याने वाढवतात. त्यांच्यापासून मुक्त होऊन आपण वीज वापर कमी करू शकता. त्याऐवजी घरात एलईडी बल्ब वापरणे सुरू करा. एलईडी बल्ब विजेचा वापर कमी करून तुम्हाला मोठ्या बिलांपासून वाचवू शकतो.

वाचा : Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या

छोट्या बदलामुळे मोठा फायदा होईल

थंडीच्या मोसमात वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल (Electricity Bills)) वाढले म्हणजे तुमचे बजेट बिघडते. जर तुम्हाला जास्त वीज बिलाची समस्या येत असेल तर तुम्हाला फक्त घरातील काही उपकरणे बदलावी लागतील. 

Read More