Marathi News> टेक
Advertisement

Ration Card नंबर द्वारे रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे; एका क्लीकवर जाणून घ्या

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन रेशन कार्ड क्रमांकावरून (Online Ration Card Number) रेशन कार्ड डाउनलोड (download) करू शकता. यासाठीची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. 

Ration Card नंबर द्वारे रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे; एका क्लीकवर जाणून घ्या

Ration Card : देशात गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी Ration Card चा उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसल्यास, तुम्ही घरबसल्या सहज यासाठी अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन रेशन कार्ड क्रमांकावरून (Online Ration Card Number) रेशन कार्ड डाउनलोड (download) करू शकता. यासाठीची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. 

 रेशन कार्ड क्रमांकावरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे?

स्टेप-1 nfsa.gov.in या वेबसाइटवर जा रेशनकार्ड क्रमांकानुसार रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये nfsa.gov.in टाइप करून सर्च करा.

स्टेप-2 रेशन कार्ड निवडा NFSA ची अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, रेशन कार्डशी संबंधित विविध तपशील पाहण्याचा पर्याय स्क्रीनवर दिसेल. आम्हाला आमचे रेशन कार्ड डाउनलोड करायचे आहे, म्हणून येथे मेनूमधील Ration Cards पर्याय निवडा. यानंतर Ration Card Details On State Portals हा पर्याय निवडा

स्टेप-3 तुमच्या राज्याचे नाव निवडा यानंतर स्क्रीनवर भारतातील सर्व राज्यांचे नाव दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव शोधावे लागेल. तुमच्या राज्याचे नाव मिळाल्यानंतर तुम्हाला ते निवडावे लागेल.

स्टेप-4 तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा तुमच्या राज्याचे नाव निवडल्यानंतर त्या राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी उघडेल. येथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव शोधून ते निवडावे लागेल.

स्टेप-5 ग्रामीण किंवा शहरी रेशन कार्ड निवडा तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडल्यानंतर, ग्रामीण आणि शहरी रेशन कार्ड काढण्याचा पर्याय स्क्रीनवर दिसेल. तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर येथे ग्रामीण रेशन कार्ड निवडा. मात्र तुम्ही शहरी भागातील असाल तर येथे अर्बन निवडा

स्टेप-6 तुमच्या ब्लॉकचे नाव निवडा रेशन कार्ड निवडल्यानंतर, तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व ब्लॉकची यादी उघडेल. येथे तुमचे ब्लॉक नाव शोधा आणि निवडा

स्टेप-7 ग्रामपंचायतीचे नाव निवडा ब्लॉकचे नाव निवडल्यानंतर त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची यादी स्क्रीनवर उघडेल. यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव शोधा आणि ते निवडा

स्टेप-8 तुमच्या गावाचे नाव निवडा ग्रामपंचायतीचे नाव निवडल्यानंतर त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांची यादी उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव शोधून ते निवडायचे आहे.

स्टेप-9 तुमचा रेशन कार्ड क्रमांक निवडा तुमच्या गावाचे नाव निवडल्यानंतर त्याखालील सर्व रेशन कार्डधारकांची यादी उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधावे लागेल. म्हणजेच या यादीत तुम्हाला कोणाच्या नावाचे रेशन कार्ड डाउनलोड करायचे आहे ते शोधावे लागेल. यादीत नाव आल्यानंतर नावासमोर दिलेला रेशन कार्ड क्रमांक निवडा.

स्टेप-10 तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करा रेशन कार्ड क्रमांक निवडल्यानंतर तुमचे रेशन कार्ड स्क्रीनवर उघडेल. येथे तुम्हाला रेशन कार्ड धारकाचे नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांचे नाव, फोटो इत्यादी तपशील दिले जातील. त्यानंतर तुम्ही Print Page बटण निवडून तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.

Read More