Marathi News> टेक
Advertisement

ऑनरचा बेजल लेस व्हू 10 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च...

चीनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या ब्रांच ऑनर बेजल लेस व्यू 10 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

ऑनरचा बेजल लेस व्हू 10 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च...

नवी दिल्ली : चीनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या ब्रांच ऑनर बेजल लेस व्यू 10 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. गुरूवार ८ जानेवारीला या फोन लॉन्चची घोषणा करण्यात आली आहे.

भारतात किंमत कमी

भारताला प्राधान्य देणाऱ्या कंपनीनी ग्लोबल मार्केटपेक्षा भारतात फोनची किंमत २०% कमी ठेवली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनची किंमत ३८ हजार रुपये आहे. तर भारतात हा फोन २९,९९९ रुपयांना लॉन्च केला जाईल. हा ऑनरचा पहिला फोन असून एआय टेक्नॉलॉजीवर आधारलेला आहे.

फिचर्स

कंपनीने सांगितले की, या फोनमध्ये पॉवरफुल किरिन ९७० चिपसेट आहेत. ज्यामध्ये न्यूरल-नेटवर्क प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे. त्यामुळे चांगला परफॉर्मेंस मिळेल. यात खूप सारे एआय अॅप्लिकेशन्स आहेत. त्यामुळे फोटो काढताना विभिन्न दृश्ये ओळखू शकेल.  इंटरनेटशिवाय रियल-टाईममध्ये काही भाषांचा अनुवाद करू शकेल. या फोनमध्ये ३,७५० एमएएचची बॅटरी आहे. १६ मेगापिक्सल आणि २० मेगापिक्सलचा ड्यूअल लेंस कॅमेरा आहे. हा फोन तुम्ही अॅमेझॉनवर खरेदी करू शकाल.

काय आहे उद्देश?

हुआवेई इंडियाचे उपभोक्ता व्यापार समुहाचे उपाध्यक्ष पी. संजीव यांनी सांगितले की, ऑनर व्यू चा शुभारंभ एका नव्या युगाची सुरूवात आहे. त्यामुळे युजर्संना ‘बुद्धिमान फोन’मिळतील आणि त्यासाठी ते प्रवृत्त होतील. त्याचबरोबर भारतीय बाजारात याची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.

 

 

Read More