Marathi News> टेक
Advertisement

गुगलचा मोठा निर्णय, 1 ऑगस्टपासून बंद होणार 'हे' स्मार्टफोन, आत्ताच चेक करा लिस्ट

Google Play Support Android Version: 1 ऑगस्टपासून गुगल मोठे बदल करणार आहेत. स्मार्टफोन युजर्सना याचा मोठा फटका बसू शकतो. काही स्मार्टफोनसाठी गुगल अँड्रोइड सपोर्ट बंद करण्याची शक्यता

गुगलचा मोठा निर्णय, 1 ऑगस्टपासून बंद होणार 'हे' स्मार्टफोन, आत्ताच चेक करा लिस्ट

Google Play Support Android Version: तुम्हीदेखील अँड्रोइड स्मार्टफोन (Android SmartPhone) वापरता का? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण अँड्रोइड स्मार्टफोनसंदर्भात गुगलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही स्मार्टफोनसाठी गुगल (Google) अँड्रोइड सपोर्ट (Android Support) बंद करणार आहे. त्यामुळं एका अर्थी तुमच्या फोन आता काहीच कामाचा उरणार नाही. कारण या फोनमध्ये तुम्ही कोणतेही अॅप डाउनलोड करु शकणार नाहीत. तसंच, जर अॅप डाउनलोड झाले तरी ते सिक्युअर नसणार आहात. पण कोणत्या कंपनींच्या स्मार्टफोनला याचा फटका बसणार आहे हे जाणून घेऊया. गुगलकडून अँड्रोइड 4.4 किटकॅटसाठी अँड्रोइड सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. (Google Stop Play Store Support)

10 वर्षांपूर्वीचे फोन होणार खराब

अँड्रोइड किटकॅट 2013मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यामुळं जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये किटकॅट किंवा त्याआधीच्या अँड्रोइड व्हर्जन असेल तर त्याचे सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच साधारण 10 वर्षांपूर्वीचे स्मार्टफोनवर गुगल सिस्टिम बंद होईल. 1 ऑगस्टपासून गुगलकडून हे बदल करण्यात येणार आहे. 

रिपोर्टनुसार, सध्या वापरात असलेल्या 1 टक्के अँड्रोइड स्मार्टफोन आणि टॅबलेट अँड्रोइड किटकॅटवर आधारित आहेत. त्यावरच  याचा परिणाम होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले सर्व्हिस सपोर्ट करणार नाही. 

गुगल प्ले सपोर्ट बंद होणार म्हणजे फोनची ऑपरेटिंग सिस्टम पूर्णपणे ठप्प होईल. म्हणजेच फोनचा वापर केलात तरी तो सिक्युरिटीच्या दृष्टीने पूर्णपणे निकामी होईल. दहा वर्षांपूर्वी बाजारात आलेले फोन सिक्युअर नसणार. त्यामुळं आत्ताच जर तुमच्याकडे हे फोन असेल तर त्यातील गरजेचा डेटा किंवा पर्सनल डेटा ट्रान्सफर करुन घ्या. तसंच, जर शक्य असल्यास डिव्हाइस रिप्लेस करुन घेणे फायदेशीर ठरेल.

Read More