Marathi News> टेक
Advertisement

Google ने बंद केलं Google Play Music ऍप

या ऍपला २०११ मध्ये केली होती सुरुवात 

Google ने बंद केलं Google Play Music ऍप

मुंबई : Google सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. Google ने आपलं सगळ्यात लोकप्रिय आणि बऱ्याच काळापासून चर्चेत असलेलं Google Play Music ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीने YouTube Music या चॅनलची सुरूवात केली होती. तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती की, Google Play Music हे ऍप बंद करण्यात येणार आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात गुगलने म्हटलं होतं की, कंपनी हळूहळू Google Play Music बंद करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिना आला आहे. कंपनीने दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच Google Play Music हे ऍप YouTube चॅनलशी रिप्लेस होणार आहे. 

आता Google Play Music ने ऑफिशिअल शट डाऊन केलं आहे. Google Play Music ऍप ओपन केल्यानंतर ही सर्व्हिस शट डाऊन केल्याचा मॅसेज येतो. गुगल प्ले म्युझिकला YouTube Music मध्ये ट्रॅक्सला मायग्रेट होऊ शकतं. ऍप ओपन केल्यावर Google Play Music वर No Longer Available असं मोठ्या शब्दात मॅसेज येतो. 

इथून गूगल प्ले म्युझिकच्या कंटेटला Youtube म्युझिकला ट्रान्सफर करणार आहे. इथे Manage your Data चं ऑप्शन देखील देण्यात येतं आहे. 

Read More