Marathi News> टेक
Advertisement

Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल.   

Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

Google Maps 360 Degree View: हातात स्मार्टफोन असणाऱ्या अनेकांकडेच Google Maps ही आहे. मुळात काही फोनमध्ये हे अॅप Pre Loaded असतं. ओ काका, अमुक एक ठिकाण कुठंय? तमूक रस्ता कुणीकडेय? हे असे प्रश्न इतरांना विचारण्याचे कष्ट या अॅपनं वाचवले आहेत. कारण, डोंगर, टेकडी, रानंवनं, जलस्त्रोस, स्टेशन इतकंच काय तर वसाहती, इमारती, मैदानं, निनेमागृह हे सर्वकाही नेमकं कुठे आहे हे या मॅपवरून अचूकरित्या सांगितलं जातं. 

तुम्ही इथं भारतात राहून दूर देशी असणारं एखादं ठिकाणही गुगल मॅप्सवर शोधू शकता किंवा छंद म्हणून ते धुंडाळू शकता. अशा या अॅपचं एक नवं फिचर सध्या सर्वांच्याच भेटीला आणण्यात आलं आहे जिथं शहरांचं आभासी चित्र (Virtual Reality) पाहायला मिळेल. प्राथमिक स्तरावर मागील वर्षी कर्नाटकाच या फिचरची चाचणी करण्यात आली होती. आता देशातील इतरही भागांमध्ये Street View हे फिचर अॅक्टिव्ह करण्यात आलं आहे. 

नव्या फिचरची मदत नेमकी कुठं होणार? 

Street View च्या माध्यमातून रस्ते, विविध इमारती, ठिकाणं इत्यादी गोष्टींचं 360 ° दृश्य तुम्हाला पाहता येणार आहे. एखाद्या ठिकाणाबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्याच या फिचरची मोठी मदत होणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हे फिचर पूर्णपणे नवं नाहीये. कारण, 2016 मध्ये संरक्षणाच्या कारणास्तव हे फिचर बंद करण्यात आलं होतं. पण, आता मात्र ते नव्या अटीशर्थींसह पुन्हा वापरात येणार असल्यामुळं युजर्ससाठी ही आनंदाची बाब ठरत आहे. जिथं स्टील इमेज दृश्य पाहता येईल. 

हे फिचर तुम्हालाही वापरायचं झाल्यास नेमकं काय करावं? 

- सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये Google Maps हे अॅप सुरु करा. 
- तुम्हाला जे ठिकाण शोधायचं आहे त्याचं नाव टाईप करून सर्च करा. 

हेसुद्धा वाचा : तयार राहा! वर्ष संपायच्या आत लॉन्च होतायत 'या' 8 धडाकेबाज SUV, दिवाळी गाजवणार  

- आता तुम्हाला साधारण नकाशा दिसू लागेल. तुम्ही जर संगणकाच्या मदतीनं मॅप्स वापरत आहात तर तिथे एक्सप्लोररच्या मदतीनं तुम्ही प्रत्येक जागेचा 360 डिग्री व्ह्यू पाहू शकता. 
- अॅप सुरु असताना स्क्रीनवर दिसणाऱ्या निळ्या रेषा तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती देतील. 

थोडक्यात हे फिचर कमाल असल्यामुळं ते तुम्हीही एकदा वापरून पाहाच. 

Read More