Marathi News> टेक
Advertisement

फक्त टाईप करताच तिथं Google तयार करणार भन्नाट व्हिडीओ; नवं AI App सोपी करणार अनेक कामं

Google OpenAI : गुगल काळाच्या दोनचार पावलं नव्हे तर, एक संपूर्ण काळच पुढे चाललं आहे आणि हे तुमच्या गेल्या काही वर्षांमधील बदल पाहून लक्षात आलंच असेल.   

फक्त टाईप करताच तिथं Google तयार करणार भन्नाट व्हिडीओ; नवं AI App सोपी करणार अनेक कामं

Google OpenAI : तंत्रज्ञान क्षणाक्षणाला बदलत आहे आणि या बदलाचा पाठपुरावा तुम्हाला सातत्यानं करता आला नाही, तरीही तंत्रज्ञानात झालेले बदल पाहून तुमच्या ही बाब लगेचच लक्षात येण्याजोगी आहे. एआयचा सर्रास वापर होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या जगतात OpenAI आणि Google कमालीचं योगदान देताना दिस आहे. यातही यांच्या स्पर्धेमध्ये आता Google बाजी मारताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे गुगलचं Google Vids हे टूल. 

नोकरीच्या ठिकाणी होणार मोठी मदत 

नोकरीच्या ठिकाणी एखादा व्हिडीओ बनवण्यासाठी गुगलचं हे अॅप बेस्ड टूल बरीच मदत करणार आहे. इथं तुम्ही Google चं तयार टॅम्पलेट पाहू आणि वापरू शकता किंवा स्वत: शाब्दिक स्वरुपात कमांड देऊन अर्थात Text लिहून त्याचा व्हिडिओ बनवू शकता. व्हिडीओ तयार झाल्यानंतर यावर तुम्ही मनाजोगा इफेक्टही जोडू शकता. इतकंच नव्हे तर, तो हवा तसा एडिट करू शकता. या व्हिडीओमध्ये तुम्ही स्वत:चा आवाज देण्याचंही फिचर आहे. किंवा Google कडे असणारे इतर आवाजही तुम्ही त्यात वापरू शकता. 

हेसुद्धा वाचा : Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा! 

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीनं गुगल विड्स तुम्हाल व्हिडीओ बनवण्यासाठी मोठी मदत करणार आहे. जिथं सर्वप्रथम एक स्टोरीबोर्ड तयार केलं जातं. स्टोरीबोर्डमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या आवडीची शैली निवडू शकता. ज्यानंतर हे अॅप तुम्हाला त्यांच्याकडे असणारे व्हिडीओ आणि Background Music वापरून व्हिडीओ ड्राफ्ट तयार करून देईल. 

वापरण्यासाठी अतिशय सोपं असणारं हे अॅप इतकं कमाल आहे की त्यावर तुम्ही एका ब्राऊजरमधून दुसऱ्या ब्राऊजरमध्येही काम करु शकता, प्रोजेक्टही शेअर करू शकता. प्राथमिक माहितीनुसार गुगलचं हे टूल/ app जून महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून AI चा वापर करत नवनवीन गोष्टी तयार करण्यावर गुगलचा भर दिसून येत आहे. तेव्हा आता Google Vids कधी वापरायला मिळतं याकडेच टेकप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

Read More