Marathi News> टेक
Advertisement

जावा बाईकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

दोन आठवड्याच्या आधीच सादर होण्याची शक्यता

 जावा बाईकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई: जावा बुलेट मोटारसाईकलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच जावा कंपनीची बाईक जावा४२ चालवण्याचा आंनद मिळणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जावा मोटारसाईकलच्या डिलीव्हरीला सुरुवात होणार आहे. जावा बाईकचे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. केवळ दोन आठवड्यातच संपूर्ण देशात या बाईकचे दर्शन होणार आहे. जावा बाईकला देशभरातून मोठी पसंदी दाखवली आहे. काही दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की, डिलिव्हरी होण्याआधीच अधिक किंमत घेऊन या बाईकची खरेदी केली जात आहे. सध्या कंपनी १०० शोरुममध्ये या बाईकच्या विक्रीची सुरुवात करणार आहे.  १५ मार्चपासून गाचीबोवली, सातारा, अनंतपूर, आणि गोरखपूर या शोरुमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. १६ मार्चला चेन्नई, सोलापूर, वाराणसी, आणि अलाहाबादमधील शोरुमचे उद्घाटन होणार आहे.  

जावा बाईकची प्रीबुकिंग नोव्हेंबर २०१८ पासून सुरु झाली होती. बाईक खरेदी करणाऱ्यांना खूप दिवस वाट बघावी लागली होती. जावा बाईकची किंमत १ लाख ६३ हजार रुपये आहे. जावा फोर्टी टू ची किंमत १ लाख ७२ हजार आहे. जावाला एचडीएफसी बॅंक, टाटा कॅपिटल, आईसीआईसीआई बॅंक, महिन्द्रा फाइनेन्स आणि आईडीएफसी बॅंक फाइनेन्स करत आहेत.

Read More