Marathi News> टेक
Advertisement

गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी

Yamaha bike Offer: यामाहा FZ-S FI Ver 4.0 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 29 हजार 400 रुपयांपासून सुरू होते. तर, RayZR 125 Fi Hybrid स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 730 रुपयांपासून सुरू होते. 

गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी
Pravin Dabholkar|Updated: Sep 19, 2023, 02:59 PM IST

Yamaha bike Offer: महाराष्ट्रासह देशभरात सकाळपासून गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे.या शुभ मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही केवळ सवलतींद्वारेच नव्हे तर कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे देखील बचत करू शकणार आहात. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी, यामाहा मोटर इंडियाने मोठी ऑफर आणली आहे. यानुसार तुम्हाला केवळ 8 हजार डाऊन पेमेंट करुन बाईक घरी आणता येणार आहे. सध्या सुरु असलेल्या गणेश चतुर्थीसाठी विशेष ऑफर्सबद्दल जाणून घ्या. 

मुंबईसाठी यामाहा ऑफर केवळ 150 cc FZ मॉडेल श्रेणी आणि RayZR 125 Fi Hybrid साठी वैध आहेत. उर्वरित महाराष्ट्रासाठी, Yamaha 150 cc FZ रेंज आणि Fascino 125 Fi-Hybrid स्कूटरवर ही सवलत असेल. या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार आहे.

ऑफरचा तपशील

3,000/- पर्यंत झटपट कॅशबॅक
कमी डाउन पेमेंट फक्त रु 7,999/- पासून सुरू होते
7.99% पेक्षा कमी व्याजदर

बाईक-स्कूटर ऑफर

यामाहा मोटर इंडियाचे म्हणणे आहे की विशेष ऑफर आणि वित्त योजना 150 FZ मोटरसायकल श्रेणी आणि 125 Fi स्कूटर श्रेणीसाठी आहेत. या ऑफर अंतर्गत तुम्हाला 3,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल. याशिवाय, फायनान्स स्कीम अंतर्गत डाऊन पेमेंट फक्त 7,999 रुपयांपासून सुरू होईल.बाईक कर्जावर 7.99 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

यामाहा एफझेड मॉडेल

यामाहाच्या सध्याच्या मॉडेल्सबद्दल जाणून घेऊया. यामाहा कंपनी सध्या चार एफझेड मोटारसायकली विकते. यामध्ये FZ-X, FZS-Fi आवृत्ती 3.0, FZS-Fi वर्जन 4.0 आणि FZ-Fi वर्जन 3.0 बाइक्सचा समावेश आहे. दुसरीकडे, 125 cc Fi Hybrid स्कूटर रेंजमध्ये Fascino 125 Hybrid, Ray ZR 125 Fi Hybrid आणि Ray ZR Street Rally 125 Fi Hybrid मॉडेलचा समावेश आहे. 

यामाहा बाईक-स्कूटरची किंमत 

इतर यामाहा मोटरसायकल किंवा स्कूटरवर कोणतीही सवलत नसेल याची ग्राहकांनी नोंद घ्या. म्हणजेच तुम्हाला R15, MT15 आणि Aerox 155 या बाईक तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर यावर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. 

यामाहा FZ-S FI Ver 4.0 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 29 हजार 400 रुपयांपासून सुरू होते. तर, RayZR 125 Fi Hybrid स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 730 रुपयांपासून सुरू होते. 

यामाहाच्या सध्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc); FZS-Fi आवृत्ती 4.0 (149cc), FZS-Fi आवृत्ती 3.0 (149cc), FZ-Fi आवृत्ती 3.0 (149cc), FZ-X (149cc), आणि Aerox 155 (155cc), Fascino 125 FI हायब्रिड (125cc) सारखी स्कूटर , रे ZR 125 FI हायब्रिड (125cc), रे ZR स्ट्रीट रॅली 125 FI हायब्रिड (125cc) पाहायला मिळतील.