Marathi News> टेक
Advertisement

Flipkart Sale: 60 हजारांचा Iphone फक्त 18 हजार रुपयांना खरेदी करा अन् मिळवा...

प्राजसत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल आयोजित करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती..

Flipkart Sale: 60 हजारांचा Iphone फक्त 18 हजार रुपयांना खरेदी करा अन् मिळवा...

Flipkart Big Saving Days Sale: येत्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ई-वेबसाइटवर भन्नाट ऑफर्स लागल्या आहेत. तुम्ही नवा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट (Flipkart) मिळत असलेल्या भरघोस डिस्काऊंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. फ्लिपकार्टवर तुम्हाला आयफोन खूप कमी किमतीमध्ये मिळू शकतो. तसेच फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सुरू आहे.  हा सेल 15 जानेवारीपासून सुरू झाला असून तो 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

तसेच फ्लिपकार्ट सेलवर स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली आहे. मात्र आयफोन खरेदीकडे तरुणांचा कल पाहून फ्लिपकार्टवर आयफोन अतिशय कमी किमतीत उपलब्ध केला आहे. या सेल दरम्यान 60,000 रुपयांचा आयफोन केवळ 18,000 रुपयांना उपलब्ध केला आहे. चला जाणून घेऊया कोणता iPhone वर किती सूट मिळत आहे.. 

आयफोन 12 मिनीची लॉन्चिंग किंमत 59,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर सुमारे 20 हजार रुपयांची सूट मिळत आहे. यानंतर, अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोनची किंमत कमी होऊ शकते.

वाचा: मेंदूचा 'हा' आजार तुमची कायमची झोप उडवेल! 

जर तुम्ही आयफोन 12 mini  खरेदी करणार असाल तर तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असले पाहिजे. कारण यावर हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तसेच iPhone 12 mini वर 20 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. पण तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तेव्हाच 20 हजारांची सूट मिळेल.  

Read More