Marathi News> टेक
Advertisement

Ferrari 296 GTS: फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 चा जबरदस्त स्पीड! भारतात लाँच झाली पॉवरफुल कार

Ferrari 296 GTS ला कंपनीने कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल दोन्ही रुपात बाजारात आणलं आहे. ही कार फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 किमीचा वेग पकडण्यात सक्षम आहे.   

Ferrari 296 GTS: फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 चा जबरदस्त स्पीड! भारतात लाँच झाली पॉवरफुल कार

Ferrari 296 GTS: भारतात चारचाकी वाहनांसाठी मोठी मागणी असून ऑटोमोबाइल कंपन्यांसाठी ही एक चांगली बाजारपेठ आहे. हॅचबॅक, SUV यासह  स्पोर्ट्स कारचाही एक मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. पण स्पोर्ट्स कारच्या किंमती जास्त असल्याने मध्यमर्गीयांसाठी मात्र त्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण विकत घेणं शक्य नसलं तरी या गाड्यांची क्रेझ मात्र प्रचंड आहे. या यादीत सर्वात अव्वल स्थानी Ferrari आहे. स्पोर्ट्स कारचं नाव घेतल्यास Ferrari चं नाव घेतलं नाही असं अशक्यच आहे. 

Ferrari ने भारतीय बाजारपेठेत आपली एक नवी कार लाँच केली आहे. Ferrari चे अधिकृत इम्पोर्टर सेलेक्ट कार्सने Ferrari 296 GTS ही कार लाँच केली आहे. हा कार कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल या दोन रुपात सादर करण्यात आली आहे, सध्या या कारची किंमत 6 कोटी 24 लाख रुपये (Ex Showroom) ठेवण्यात आली आहे. 

नेहमीप्रमाणे आपला जबरदस्त लूक आणि पॉवरफूल इंजिनमुळे ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या कारमध्ये ग्राहकांच्या पसंतीस पडतील असे अनेक फिचर्स आहेत. सेलेक्ट कार्सने नव्या Ferrari 296 GTS ला एअरोसिटी स्थित अंदाज हॉटेलमध्ये सादर केलं. ही कार लाँच करताना आपल्याला आनंद होत असल्याचं फेरारीचे मार्केटिंग हेड संयम त्यागी यांनी सांगितलं आहे. 

या कारमध्ये 3 लीटरच्या क्षमतेचं V6 टर्बोचार्ज इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 610kW ची पॉवर आणि 6250 आरपीएमवर 740 Nm चा टॉर्क जनरेट करते.  या इंजिनला 8-स्पीड F1 ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. या इंजिनचं आर्किटेक्चर अशाप्रकारे करण्यात आलं आहे की, ते त्याला अजून कॉम्पॅक्ट बनवतं. ही एक हायब्रीड कार असल्याने यामध्ये 7.45 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

ही रिअर-व्हील ड्राइव्ह प्लग-इन हायब्रीड आर्किटेक्चर असणारी ही पहिली ओपन-टॉप फेरारी आहे. यामध्ये ICE इंजिन रिअर-माऊंटेड इलेक्ट्रिक मोटरसह इंटिग्रेट करण्यात आलं आहे. TMA एक्ट्यूएटरच्या माध्यमातून यामध्ये दोन वेगवेगळे पॉवर युनिट्स देण्यात आले आहेत, जे एकत्र किंवा फक्त इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्याची सुविधा देतं. इलेक्ट्रिक मोटर 296 GTS पॉवर आऊटपूटला 830 cv पर्यंत वाढवतं. तसंच कारचा परफॉर्म्सनही वाढवतं. इलेक्ट्रिक मोडमध्ये ही कार 25 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. 

इतर फेरारीप्रमाणे यामध्येही कारचं इंजिन मागील बाजूस देण्यात आलं आहे. कारमध्ये दोन सीट असून खास बाब म्हणजे, फ्रंट बोनटच्या आतमध्ये स्पेसिफिकेशन सीट देण्यात आली आहे. या कारमध्ये 65 लीटरचा फ्यूएल टँकही मिळतो. 

ही कार फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन थेट ताशी 100 किमीचा वेग पकडण्यात सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारचं एक्सेलरेशन इतकं पॉवरफूल आहे की, 0 ते ताशी 200 किमीचा वेग पकडण्यासाठी फक्त 7.6 सेकंदाचा वेळ लागतो. या कारचा टॉप स्पीड ताशी 330 किमी आहे. या कारची किंमत 6 कोटी 24 लाख (Ex Showroom) ठेवण्यात आली आहे. 

Read More