Marathi News> टेक
Advertisement

Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर

Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...  

Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर

Facebook Meta : मेटाकडून युजर्स आणि सोशल मीडियावरील काही महत्त्वाच्या गोष्टींच्या धर्तीवर सातत्यानं या माध्यमामध्ये काही बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता एका नव्या फिचरसह काही महत्त्वपूर्ण बदलांची पुन्हा नव्यानं भर पडली आहे. ज्यामुळं इथून पुढं फेसबुक वापरताना तुम्हाला काही नव्या गोष्टी पाहता येतील.

काय असलीत नवे बदल?

नव्या फिचरमुळं फेसबुकवर यापुढं युजर्सना त्यांच्या गरजेनुसार फिडवर नियंत्रण ठेवता येणार आहे. आपल्याला कोणत्या गोष्टी जास्त पाहायला आवडतील आणि कोणत्या गोष्टी कमी, यावर आता युजर्स नियंत्रण ठेवणार आहेत. फेसबुक रील्समध्ये तुम्हाला हे बदल पाहता येणार असून, आता तुम्ही जेव्हाजेव्हा Reels पाहायचे असतील तेव्हा दोन नवे पर्याय देण्यात येणार आहे. (facebook Meta new features personalisation controls for reels latest tech news )

पर्याय पाहण्यासाठी तुम्ही स्क्रीनमध्ये खालच्या बाजुला असणाऱ्या तीन टिंबांच्या एका आयकॉनवर क्लिक करावं लागणार आहे. इथं तुम्हाला Show More / Show less असे दोन पर्याय दिसतील.

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?

समजा तुम्ही एखादा व्हिडीओ/ रील पाहत आहात आणि तुम्हाला तो आवडत नाहीये तर तुम्ही शो लेस हा पर्याय निवडू शकता. रील किंवा व्हिडीओ आवडल्यास तुम्ही शो मोर हा पर्याय निवडू शकता. इथं तुमच्या Interest ला अनुसरून फेसबुक पुढं अल्गोरिदमनुसार तुम्हाला तुमच्याच आवडीचा कंटेंट दाखवेल, किंवा न आवडते विषय तुमच्यापासून दूर ठेवेल. सुरुवातीला फेसबुकच्या इतर पोस्टसाठी उपलब्ध असणारा हा पर्याय आता रील्ससाठीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Recomended Reels सुद्धा पाहता येणार...

तुमच्या प्राधान्यानुसारच नव्हे तर आता तुम्हाला मित्रमंडळींनी Recomend केलेले रील्सही पाहता येणार आहेत. हे रील्स तुम्हाला आवडले नाहीतर तर ते मॅन्युअली बंद करण्याची मुभाही तुम्हाला असेल. इथंही हा Show More / Show Less हे पर्याय फायद्याचे ठरणार आहेत.

फेसबुकमध्ये आणखी काय बदललं?

मेटाकडून आणखी महत्त्वाचे बदल करत हे माध्यम वापरणाऱ्यांना जास्तीत जास्त चांगला अनुभव कसा देता येईल यालाच प्राधान्य दिलं आहे. बदलांच्या या Facebook Watch चाही समावेश आहे. जिथं तुम्हाला या एका पर्यायामुळं रील्सचा आयकॉन स्क्रीनवर वेगळा दिसेल. इथं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं  म्युझिक, व्हिडीओ आणि इतरही कंटेंटवर Switch करु शकता. फेसबुकच्या या नव्या पर्यायांमुळं आता रील्स बनवणाऱ्या मंडळींमध्ये या पर्यायांचा वापर नेमका कसा केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

 

 

 

Read More