Marathi News> टेक
Advertisement

Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?

Twitter संदर्भातील बऱ्याच बातम्या आणि माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग ते नोकरकपात असो किंवा मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असो. पण आता मात्र चक्क ट्विटरच्या विक्रीचीच चर्चा सुरुये   

Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?

Elon Musk Twitter : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या ट्विटरमध्ये मागील काही महिन्यांपासून बरेच बदल झाल्याचं पाहायला मिळालं Blue Tick जाण्यापासून त्यामध्ये होणाऱ्या सर्व बदलांना नेटकरी आणि ट्विटर युजर सामोरे गेले. ज्यानंतर आता याच ट्विटरचे मालक, म्हणजेच एलन मस्क काहीसे अडचणीत असल्याचं कळत आहे. (Elon Musk is planning to sell Twitter wights rumors)

ट्विटरचे मालकी हक्क ताब्यात आल्यानंतर मस्क यांनी या प्लॅटफॉर्मच्या अनेक गोष्टींमध्ये महत्त्वाचे आणि लक्षवेधी बदल केले. नोकरकपात म्हणू नका किंवा ट्विरचे फिचर्स म्हणू नका. हे बदल चर्चांचा विषयही ठरले. हे सर्व करूनही आता मस्क यांना ट्विटरकडून अपेक्षित यश मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. हल्लीच त्यांनी BBC ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अशा काही गोष्टींचा उल्लेख केला ज्यामुळं सर्वांच्याच नजरा वळल्या. 

हेसुद्धा वाचा : Twitter Blue Tick : तुम्हाला ब्लू टिक हवेय ! ट्विटरकडून 20 एप्रिल डेडलाईन

ट्विटरची खरेदी करण्याचा पश्चाताप होतो का? असा प्रश्न मस्क यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देत, 'प्रचंड वेदनादायक...' अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं. ट्विटरचा अनुभव सुखद नसून तो उत्साहपूर्णही नव्हता असंही ते म्हणाले. हा अनुभव कंटाळवाणा नसला तरीही जेव्हापासून आपण ही Micro Blogging Site खरेदी केली आहे तेव्हापासून या प्रवासात प्रचंड चढ- उतार आल्याचं ते म्हणाले. 

ट्विटर विकण्याची तयारी? 

कर्मचाऱ्यांना दिवसातून जास्तीत जास्त तासांसाठी काम करण्यास सांगणाऱ्या मस्क यांनी आपल्यावरही कामाचा प्रचंड भार असल्याची बाब मुलाखतीत मांडली. कामाचा ताण आणि जबाबदारी इतकी आहे, की वेळप्रसंगी आपण कार्यालयातच झोपतो, तिथं असणाऱ्या Reading Room चा आधार घेतो असंही त्यांनी सांगितलं. इतक्यावरच न थांबता एकिकडे ट्विटर खरेदीचा निर्णय चुकला नसला तरीही दुसरीकडे मात्र एखाद्या चांगल्या व्यक्तीनं तायरी दाखवली तर आपण ट्विटरच्या विक्रीचा करार करू असंही सूतोवाच त्यांनी केलं. 

दरम्यान, या संपूर्ण मुलाखतीत त्यांनी ट्विटरमध्ये करण्यात आलेल्या नोकरकपातीसंदर्भातील (Twitter Layoff) प्रश्नांचीही उत्तरं दिली. जवळपास 80 टक्के कर्मचारी संख्या कमी करणं हा सोपा निर्णय नव्हता असं ते म्हणाले. 8 हजारांवरून ट्विटरची कर्मचारी संख्या थेट 1500 वर आणली गेली आहे, असं करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत संवाद साधणं कठीण असल्यामुळं ईमेलच्या माध्यातून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचं मस्क यांनी सांगितलं. 

 

 

Read More