Marathi News> टेक
Advertisement

फक्त 10 हजारात घरी घेऊन या इलेक्ट्रिक स्कुटर, फीचर्स आणि EMI सह जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत.

फक्त 10 हजारात घरी घेऊन या इलेक्ट्रिक स्कुटर, फीचर्स आणि EMI सह जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : पेट्रोल आणि डिजेलच्या वाढत्या किंमती पाहाता सर्वच लोक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळले आहेत . इलेक्ट्रिक गाड्यांकडे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहे. परंतु होतं काय की, या गाड्या महाग असल्यामुळे लोक या गाड्यांना विकत घेताना 10 वेळे विचार करतायत. परंतु ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही स्कुटर नक्की घरी आणाल.

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही फक्त 10 हजार रुपये देऊन ही स्कूटर घरी आणू शकता.

वास्तविक, बाजारात इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्मात्या Ather Energy च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्यांची नावे Ather 450 Plus आणि Ather 450X आहेत. त्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु तुम्ही तिला 10 हजारात घरी आणू शकता, आज आम्ही तुम्हाला याच्या EMI प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल आणि तुमच्या बजेटमध्ये देखील गाडी येईल.

सर्वप्रथम Ather 450X च्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 116 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. यासोबतच गाडीचा टॉप स्पीड 80 किमी आहे. या स्कूटरमधील ब्रेकिंग सिस्टीमसाठी कंपनीने पुढच्या आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक सिस्टीम वापरली आहे.

Ather 450X 2.9kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे, 6000W मोटरसह. बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने ती केवळ 35 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होते.

जर तुम्ही BikeDekho नावाच्या वेबसाइटवर गाडी पाहा तर EMI वर तुम्हाला या स्कूटरची किंमत 1.31 लाख रुपये बसेल. खरेदीच्या वेळी वापरकर्त्यांनी 10 हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून दिल्यास, वापरकर्त्यांना 9.7 टक्के दराने दरमहा 4360 रुपये द्यावे लागतील.याचे हप्ते 36 महिने चालतील.

Read More