Marathi News> टेक
Advertisement

Ducati ने भारतात लाँच केली 11.49 लाख रुपयांची जबरदस्त बाइक, जाणून घ्या वैशिष्ट्य

डुकाटीने भारतीय बाजारात नवीन Scrambler Urban Motard लाँच केली आहे. 

Ducati ने भारतात लाँच केली 11.49 लाख रुपयांची जबरदस्त बाइक, जाणून घ्या वैशिष्ट्य

Ducati Scrambler Urban Motard Price, Features & Specifications: डुकाटीने भारतीय बाजारात नवीन Scrambler Urban Motard लाँच केली आहे. आयकॉन, आयकॉन डार्क, नाईटशिफ्ट आणि डेझर्ट स्लेजसह मोटारसायकल 800cc स्क्रॅम्बलर लाइन-अपमध्ये सामील झाली आहे. नवीन Ducati Scrambler Urban Motord भारतात 11.49 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही गाडी देशभरातील सर्व डुकाटी डीलरशिपवर उपलब्ध असणार आहे. डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले, “Scrambler Urban Motord मोटरसायकल  ग्राहकांना शहरी वातावरणाचा आनंद आणि उत्साहपूर्ण अनुभव घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आमच्या रायडिंग कम्युनिटीला त्याची ओळख करून देताना आम्हाला आनंद होत आहे."

नवीन डुकाटी स्क्रॅम्बलर अर्बन मोटरेड, 'स्टार व्हाईट सिल्क आणि रेड जीपी 19' या विशेष रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. याला काळ्या फ्रेम आणि लाल टॅगसह एक काळी सीट मिळते. ही मोटरसायकल 803cc L-ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे जी 8,250 RPM वर 72 bhp पॉवर आणि 5,750 RPM वर 66 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

डुकाटी स्क्रॅम्बलर मोटरसायकलचे वजन 180 किलो आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, यात 41mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर आहे. बाईकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.  बाजारात याची स्पर्धा Triumph Trident 660 आणि Honda CB 650 R सारख्या बाइक्सशी असेल.

Read More