Marathi News> टेक
Advertisement

WhatsApp वर कस कराल Aadhar Card आणि Pan Card डाऊनलोड

जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आता युजर्ससाठी खास सुविधा सुरू केली आहे. 

 WhatsApp वर कस कराल Aadhar Card आणि Pan Card  डाऊनलोड

मुंबई : Digilocker On WhatsApp: जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आता युजर्ससाठी खास सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही फक्त एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि आरसी यासारखे आवश्यक डॉक्युमेंट्स डाऊनलोड करू शकता. त्यामुळे आता डॉक्युमेंटस बाळगण्याची चिंता मिटली आहे.  

सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. म्हणजेच तुम्ही फक्त एका नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून Digilocker सर्व्हिस वापर करू शकता.

हा नंबर सेव्ह करा

व्हॉट्सअ‍ॅपवर डिजिलॉकर सेवेत प्रवेश करण्यासाठी, प्रथम तुम्हाला +९१-९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. यानंतर तुम्हाला या नंबरवर DigiLocker लिहून WhatsApp करावे लागेल. युजर्स त्यावर नवीन अकाउंट्स देखील तयार करू शकतात. जर तुमच्याकडे आधीच डिजिलॉकर अकांउट असेल तर तुम्ही आधार क्रमांकाद्वारे त्यात प्रवेश करू शकता. तुमच्या नोंदणीकृत आधार क्रमांकावर OTP येईल, ज्याद्वारे तुम्ही अकाउंट व्हेरिफाय करू शकता.

'ही' कागदपत्रे डाऊनलोड करता येणार 

 डिजीलॉकरच्या या सेवेद्वारे तुम्ही फोनवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, विमा पॉलिसी, दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट यांसारखी कागदपत्रेही डाउनलोड करू शकता. 

MyGov हेल्पडेस्क सेवा २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. याद्वारे, COVID-19 दस्तऐवज देखील डाउनलोड केले जाऊ शकतात. आता यावर तुम्हाला डिजीलॉकरची सेवा देखील मिळणार आहे.

Read More