Marathi News> टेक
Advertisement

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

मोबाईल कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत. 

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई : मोबाईल कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत. याचा फायदा हा मोबाईल धारकांना होत आहे. आता रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया अर्थात  Viने दोन एकदम स्वस्त प्लान बाराजात आणले आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहकांसाठी हे बेस्ट प्लान असणार आहेत. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा ऑफर केला जात आहे.

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने आपल्या युजर्ससाठी  99 आणि 109 दोन स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत.  दोन्ही प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा ऑफर केला जात आहे. Viच्या या प्लानची रिलायन्स जिओच्या 98 रुपये आणि एअरटेलच्या129 रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर असणार आहे.

व्होडाफोन-आयडियाचा 99 रुपयांचा प्लान

Vi चा हा प्लान 18 दिवसांच्या वैधतेसोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट युजेससाठी 1 जीबी डेटा देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे.  मात्र, मोफत SMSची सुविधा नाही. 

व्होडाफोन-आयडियाचा 109 रुपयांचा प्लान

व्होडाफोन-आयडियाच्याया प्लानमध्ये तुम्हाला 20 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये 99 रुपयांच्या प्लान प्रमाणे 1 जीबी डेटा मिळतो. या प्लान घेतल्यानंतर देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येवू शकते. मात्र, मोफत SMSची सुविधा नाही.

रिलायन्स जिओचा 98 रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओ कंपनीने या प्लानला गेल्या वर्षी बंद केले होते. परंतु, याची मागणी आणि क्रेझ पाहून जिओने हा प्लान मे 2021 मध्ये पुन्हा लॉन्च केला आहे. 14 दिवसांची वैधता मिळत असलेल्या या प्लानमध्ये एकूण 1.5 जीबी डेटा ऑफर मिळत आहे. तसेच यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

एअरटेलचा 129 रुपयांचा प्लान

एअरटेलचा हा प्लान 24 दिवसाच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग सोबत पूर्ण वैधतेसाठी 1 जीबी डेटा ऑफर देत आहे. यात 300 SMS फ्री आहेत. अॅमेझॉन प्राईमही फ्री मिळत आहे.

Read More