Marathi News> टेक
Advertisement

Pravaig Defy: भारतातील 'या' कंपनीनं तयार केली 'देसी टेस्ला', 500 किमी रेंज आणि 210 प्रतितास वेग

Pravaig Defy: या गाडीमध्ये 90.2 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 30 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या बॅटरीमुळे 402 बीएचपी मॅक्स पॉवर आणि 620 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Pravaig Defy: भारतातील 'या' कंपनीनं तयार केली 'देसी टेस्ला', 500 किमी रेंज आणि 210 प्रतितास वेग

Pravaig Defy Electric SUV: भारतीय बाजारात एन्ट्री घेण्यासाठी टेस्ला कंपनी प्रयत्न करत आहे. एलोन मस्क यासाठी केंद्र सरकारसोबत वाटाघाटी करत आहेत. मात्र काही अटी आणि शर्थी असल्याने विलंब होत आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचं मत आहे की, कार आयात करून भारतीय बाजारात विकावी. तर केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, भारतात कार तयार करा आणि विका. असं असलं तरी भारतीय कारप्रेमींना टेस्लाच्या कारबाबत उत्सुकता आहे. मात्र भारतीय कंपनीनं ही उणीव भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे. बंगळुरू स्थिती इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप Pravaig Dynamics कंपनीने ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही ravaig Defy लाँच केली आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 39.50 रुपये एक्स शोरुम आहे. 

काय आहेत फीचर्स जाणून घ्या

Pravaig Defy या गाडीमध्ये 90.2 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 30 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या बॅटरीमुळे 402 बीएचपी मॅक्स पॉवर आणि 620 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी बॅटरी पूर्ण चार्ज असल्यावर 500 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. तसेच 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग पकडू शकते. या गाडीचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे. 

बातमी वाचा- Photo: Toyota Innova Hycross गाडीचं भारतात सादरीकरण, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Pravaig Defy गाडीत कनेक्टिविटीसाठी मोठा टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम, डेविएलेट स्टीरिओ, कनेक्टेड कार टेक, एअर प्युरीफायर, वायरलेस फोन चार्जिंग, यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट, रियर टचस्क्रिन, कूल्ड, इलेक्ट्रली एडजेस्टबल कॅप्टन सीट्स आणि ट्विन सनरूफ सारखे फीचर्स आहेत. ही गाडी 11 रंगामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये एम्परर पर्पल, हल्दी येलो, मून ग्रे, शनि ब्लॅक, हिंडिगो, बॉर्डिओक्स, 5.56 ग्रीन, लिथियम, वर्मिलियन रेड, काजीरंगा ग्रीन आणि सियाचिन ब्लू या रंगात आहेत.

Read More