Marathi News> टेक
Advertisement

स्मार्टफोन वापरणाऱ्यांनो सावधान! तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्स अशी वापरतायत ट्रीक

मालवेअर पाठोपाठ पेगासस प्रकरण अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका धोकादायक व्हायरसचा वापर करून हॅकर्स डेटा चोरी करत आहेत.

स्मार्टफोन वापरणाऱ्यांनो सावधान! तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्स अशी वापरतायत ट्रीक

मुंबई : मालवेअर पाठोपाठ पेगासस प्रकरण अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका धोकादायक व्हायरसचा वापर करून हॅकर्स डेटा चोरी करत आहेत. हॅकर्स डेटापर्यंत पोहोचण्यासाठी आता वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करत आहेत. पेगासस पाठोपाठ आता स्पायवेअरचा वापर हॅकिंगसाठी होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुप्त माहिती काढण्यासाठी याचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पायवेअरचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हॅकर्स पोहोचण्यात यशस्वी होत आहेत.

पेगाससनंतर आता नवा एन्ड्राँइड स्पायवेअर समोर आला आहे. त्याचं नाव हर्मिट असल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची जासूसी करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. या लिस्टमध्ये अनेक बडे उद्योगपती, ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स, पत्रकार, सरकारी अधिकारी यांचा देखील समावेश असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे स्पायवेअर इटलीच्या स्पायवेअर विक्रेत्या, आरसीएस लॅब आणि टेलिकम्युनिकेशन सोल्यूशन कंपनी Tykelab Srl ने तयार केलं आहे.

हा स्पायवेअर या वर्षी एप्रिलमध्ये कझाकिस्तानमध्ये पहिल्यांदा सापडला. कझाक सरकारने सरकारी धोरणांविरोधात जाणाऱ्या जनतेला दडपले तेव्हा ही माहिती मिळाली. या स्पायवेअरचा वापर सीरियाच्या ईशान्य कुर्दिश प्रदेशात आणि इटलीमध्ये भ्रष्टाचार विरोधी कारवाया किंवा  तपासासाठी करण्यात आला होता असं लुकआउटच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

 हर्मिट स्पायवेअर एक असा Android स्पायवेअर आहे जो एका SMS च्या मदतीने सिस्टममध्ये सहजपणे सोडला जाऊ शकतो. हा SMS टेलिकॉम कंपन्यांसारखाच येतो. अनेक बड्या फोनच्या कंपन्यांकडूनही असे SMS पाठवल्याचं समोर येतं. प्रत्यक्षात तो मेसेज हॅकर्सने पाठवलेला असतो. त्यामुळे त्यावर क्लीक करून डाऊनलोड केले जातात आणि तिथेच लोक फसतात आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात.

Read More