Marathi News> टेक
Advertisement

एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये


Phones With Best Battery Life: फोन घ्यायचा विचार आहे पण चांगली बॅटरी, किंमत, कॅमेरा या सगळ्याचा विचार केला जातो. आम्हीपण तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन घेऊन आलोत. 

एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये

Best Battery Smartphone: स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय. तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट बॅटरी लाइफ असलेल्या स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत. किंमतही कमी असलेल्या या स्मार्टफोनला एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस आरामात त्याची बॅटरी चालेल. बाजारात असलेले स्मार्टफोन 4500 mAh किंवा 5000 mAh पर्यंत बॅटरी क्षमता असलेले फोन आहेत. मात्र आम्ही तुम्हाला 6000mAh बॅटरी असलेले फोनबाबत माहिती देणार आहोत. 

स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकणारी असेल तरच तो युजर्ससाठी कामाचा असतो असं बोललं जातं. फोन सतत चार्ज करायला लागला किंवा दिवसातून दोनदा तीनदा बॅटरी उतरत असेल तर अशावेळी युजर्सनाही फोनचा त्रास जाणवायला लागतो. कारण अगदी कामाच्या वेळी फोनची बॅटरी संपली तर अडचणी निर्माण होतात. म्हणूनच एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस बॅटरी टिकणारे कोणते फोन आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पॉवरफुल बॅटरी असणाऱ्या या फोनबाबत जाणून घेऊया. 

Samsung Galaxy F34

सॅमसंगच्या या मोबाइलमध्ये 6.5 इंचाचा सुपर अॅमॉलेड डिस्प्ले देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर 120 HZचा रिफ्रेश रेटदेखील मिळतो. कंपनीने Samsung Galaxy F34 फोनमध्ये इन हाउस Exynos 1280 चिपसेट देण्यात आली आहे. यात 6 RAM आणि 120 GB स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy F34 मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 13 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

फोनच्या बॅटरी पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास यात 6000 mAh बॅटरीची क्षमता देण्यात आली आहे. यूएसबी टाइप सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. Samsung Galaxy F34 फोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. 

Moto G54 256GB

मोटोरोलाच्या या फोनची किंमत 18,999 रुपये इतकी असून यात 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 HZ आहे. Moto G54 256GB मध्ये मीडीयाटेक डायमेसिटी 7020 चिपसेट देण्यात आला आहे. 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज या फोनमध्ये देण्यात आली आहे. Moto G54 256GB मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यूएसबी टाइप सी टर्बो चार्जरला सपोर्ट करते. 

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यात 50 MPचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 MPचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 Mp फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 

Infinix Smart 7

Infinix Smart 7 या फोनची किंमत 6,569 रुपये आहे. या फोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर आहे जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह जोडलेला आहे. या फोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh बॅटरी आहे, जी यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्टसह येते.

Infinix Smart 7 फोनमध्ये 6.6 इंच LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 60Hz आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 13MP प्रायमेरी कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.

Read More