Marathi News> टेक
Advertisement

लवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार

बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. 

लवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार

नवी दिल्‍ली : बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. 

बजाजची नवी मिनी कार

लवकरच या वाहनाचा उपयोग देशातील ट्रान्सपोर्ट मोडच्या रूपात केला जाणार आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ मध्ये क्वाड्रीसायकलसाठी कोणताही कायदा नसल्याने आत्तापर्यंत ही चारचाकी मॉडर्न ऑटो रिक्षा आत्तापर्यंत भारतीय रस्त्यावर आली नाहीये.

देशाबाहेरही करणार लॉन्च

पण आता सरकार या वाहनाला मान्यता देण्याच्या विचारात आहे. गेल्या काही वर्षांपासून बजाज कंपनी ही क्यूट क्वाड्रीसायकल भारतात लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. बजाज क्यूट भारतात निर्मित क्वाड्रीसायकल असून ही देशाबाहेरही लॉन्च करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

सरकार नियम तयार करणार

रस्ते परिवहन मंत्रालयाने भारतात क्वाड्रीसायकलसाठी नियम बनवण्याचा निर्णय घेतलाय. वाहनाचे वजन आणि इंजिन आकार यावरून वाहनाच्या वेगाची क्षमता ठरवली जाणार आणि प्रवाशांसाठी तसेच रस्तावर चालणा-या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टॅंडर्ड सुरक्षा नियम तयार केले जातील. 

किती असेल किंमत?

बजाज क्यूटचं सुरूवातीचं नाव आरई६० होतं आणि हे वाहन यूरोपिय देशांमध्ये विकले जात आहे. याची जास्तीत जास्त स्पीड ७० किमी प्रति तास आहे आणि कंपनीने दावा केलाय की, या वाहनाचा मायलेज ३६ किमी प्रति लिटर आहे. बजाजकडून या वाहनाची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाहीये. तरीही असा अंदाज आहे की, या वाहनाची किंमत २ लाख रूपये ठेवली जाऊ शकते.

Read More