Marathi News> टेक
Advertisement

बजाज लॉन्च करणार सर्वात स्वस्त कार

बजाज लॉन्च करणार सर्वात स्वस्त कार

बजाज लॉन्च करणार सर्वात स्वस्त कार

मुंबई : देशातील मोठी टू-व्हीलर कंपनी बजाज ऑटो लवकरच स्वस्त मायक्रो-कार 'क्यूट'ची विक्री सुरु करणार आहे. जवळपास 6 वर्षांपासून सरकारी फेऱ्य़ात अडकलेली ही बजाज कार क्‍यूट आता लवकरच रस्त्यावर धावणार आहे. मि‍नि‍स्‍टरी ऑफ रोड ट्रांसपोर्ट अँड हायइवेजने quadricycle च्या कमर्शियल यूजबाबतचया पॉलिसीला मंजूरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार quadricycle कॅटेगरीला मंजूरी देण्यासाठी लवकरच नोटिफिकेशन जारी केलं जाऊ शकतं. नोटिफिकेश आल्यानंतर बजाज आपली स्वस्त कार भारतात विक्रीसाठी लॉन्च करणार आहे.

Qute कार बजाज ऑटोने 2012 च्या दि‍ल्‍ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने सादर केली होती. पण भारतात  क्‍वाड्रा सायकलला मंजूरी नसल्याने ती विक्रीसाठी रस्त्यावर येऊ शकली नव्हती. पण दक्षिण पूर्व आशि‍यासह जगातील अनेक देशांमध्ये ही कार खूप प्रसिद्ध झाली होती. कमी किंमतीत जास्त मायलेज ही कार देणार आहे.

कमी प्रदूषण करणारी कार

कंपनीने दावा केला आहे की, ही कार ग्रीन कार आहे. या कारमधून सर्वात कमी कार्बनडाऑक्साईट बाहेर पडतो. या कारमध्ये 216.6 सीसीचं इंजिन आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार सीएनजी आणि एलपीजी वेरि‍एंटमध्ये दखील उपलब्ध होणार आहे. 70 कि‍लोमीटर सर्वाधीक स्पीड आणि पीक पावर 13.2 पीएस असणार आहे. ही कार वजनाने देखील कमी असल्याने यासाठी कमी इंधन लागेल. भारतीय रस्त्यानुसार ही बनण्यात आली आहे. 

एक लीटरमध्ये 36 कि‍लोमीटर ही कार चालते. भारतात याची किंमत अजून जाहीर झालेली नाही पण अंदाजे ती 1.28 लाखांना मिळणार आहे.

Read More