Marathi News> टेक
Advertisement

1.5 टन गाडीला ठोकलं, ट्रकच्या खाली चिरडलं, पण CNG जागचा हलला नाही; बजाजची CNG बाईक किती सुरक्षित?

Bajaj Freedom 125 CNG Bike: बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 CNG भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या बाईकची किंमत 95 हजार ठेवण्यात आली आहे.   

1.5 टन गाडीला ठोकलं, ट्रकच्या खाली चिरडलं, पण CNG जागचा हलला नाही; बजाजची CNG बाईक किती सुरक्षित?

Bajaj Freedom 125 CNG Bike: बजाज ऑटोने (Bajaj Auto) जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 CNG भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या बाईकची किंमत 95 हजार ठेवण्यात आली आहे. एकूण तीन व्हेरियंट्समध्ये येणाऱ्या या बाईकसाठी देशभरात अधिकृत बुकिंग सुरु कऱण्यात आली आहे. कंपनीची अधिकृत वेबसाईट किंवा डिलरशिपच्या माध्यमातून तुम्ही ही बाईक खरेदी करु शकता. 

फिचर्स काय आहेत?

Bajaj Freedom मध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचा सिंगल सिलेंडर वापरला आहे. जो 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये कंपनीने 2 लीटरचा पेट्रोल फ्यूएल टँक आणि 2 किग्रॅचा सीएनजी टँक दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक फूल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 330 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. 

बाईक रस्त्यावर किती सुरक्षित?

एकीकडे बाईकच्या फिचर्सची चर्चा असताना दुसरीकडे लोकांना ही बाईक रस्त्यावर किती सुरक्षित आहे असाही प्रश्न पडला आहे. याचंही उत्तर बजाजने दिलं आहे. कंपनीचा दावा आहे की, या बाईकने इंडस्ट्रीच्या 11 वेगवेगळ्या चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. या बाईकला फ्रंट, साईड, टॉप इतकंच नाही तर ट्रकच्या खाली चिरडूनही टेस्ट करण्यात आलं आहे, 

बाईकच्या सीएनजी टँकला PESO कडून (पेट्रोलिअम एंड एक्स्पोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन) अधिकृत प्रमाणपत्र मिळालं आहे, जे सरकारी सुरक्षा मानकांची निश्चितता करतो. 

बजाजने या बाईकला इन-हाऊस फॅसिलिटीमध्ये स्पेशल सेटअप करत टेस्ट केलं आहे. फ्रंट कोलाइजन टेस्टमध्ये बाईकसमोर 1.5 टनाच्या वस्तूशी धडक देत किती मजबूत आहे याची चाचणी करण्यात आली. यावेळी बाईकचा स्पीड ताशी 60 किमी होता. भारतीय बाजारपेठेत Hyundai Alcazar सारख्या एसयुव्हीचं वजन जवळपास 1.5 टन असतं.

याशिवाय बाईकला 10 टन वजनाच्या ट्रकने चिरडत ट्रक रनओव्हर टेस्टही करण्यात आली. बजाज फ्रीडमचं एकूण वजन 147 किलो आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सर्व क्रॅश टेस्टमध्ये बजाज फ्रीडम बाईक पूर्णपणे सुरक्षित होती. तसंच बाईकचा सीएनजी टँकही पुर्णपणे सुरक्षित राहिला. 

Read More