Marathi News> टेक
Advertisement

बाजारात लवकरच धुमाकूळ घालणार BAJAJ च्या या २ बाईक्स

नव्या वर्षात वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो बाजारात नव्या बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना काही हटके देण्याचा प्रयत्न बजाज करणार आहे.

बाजारात लवकरच धुमाकूळ घालणार BAJAJ च्या या २ बाईक्स

मुंबई : नव्या वर्षात वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो बाजारात नव्या बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना काही हटके देण्याचा प्रयत्न बजाज करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चाही होती की बजाज बाजारात नव्या बाईक लाँच करु शकते. मात्र आता इंटरनेटवर सध्या बजाजच्या दोन बाईक्सचे फोटो व्हायरल होतायत ज्यावरुन बजाज लवकरच दोन बाईक बाजारात उतरवणार असल्याचे समजतेय. मिळालेल्या माहितीनुसार ११० सीसीसह डिस्कव्हरचे नवे मॉडेल बजाज आणणार आहे. 

fallbacks

डिस्कव्हर ११० सीसी सध्या बाजारात येणाऱ्या डिस्कव्हरच्या किंमतीपेक्षा कमी आहे. याशिवाय कंपनी सध्याच्या डिस्कव्हर १२५ सीसीला अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे. 

याआधी बजाजने गेल्या वर्षी स्वस्त बाईक प्लॅटिनाला डीआरएल लाईट्सला फेसलिफ्ट अवतारात आणले होते. कंपनीचा असा दावा आहे की बाजारात ग्राहकांकडून याला चांगली प्रतिक्रिया मिळाली. 

डिस्कव्हर ११० बाबत बोलायचे झाल्यास कंपनीने ग्राहकांकडून मिळालेल्या सूचनेनुसार डिझाईन केलीये. याशिवाय मायलेजच्या बाबतीतही इतर बाईक्सच्या तुलनेत ही सरस आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाजच्या या बाईकमध्य ब्लॅक अलॉय व्हील्स, इंजिन आणि फ्रंट फोर्क देण्यात आलाय. यासोबतच बाईकमध्ये नवा अॅनालॉग-डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर लावण्यात आलाय. ११० सीसीच्या सिंगल सिलेंडर इंजिनवाल्या या बाईकमध्ये एअर कूल टेक्नोलॉजी आहे. याचे इंजिन ८.५ bhp पॉवर जनरेट करते. 

fallbacks

डिस्कव्हर १२५च्या नव्या मॉडेलमध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन देण्यात आलेय. या बाईकमध्ये ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय. कंपनीकडून अद्याप या बाईक्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार, डिस्कव्हर ११० ही बाईक ४८ हजार रुपयांमध्ये लाँच करु शकते. तर डिस्कव्हर १२५ची किंमत ५५ हजार रुपये असू शकते. 

याआधी फेस्टिव्ह सीझनमध्ये  Platina ComforTecला कंपनीने ४६ हजार ६५६ रुपयांत लाँच केले होते. या बाईकचा मायलेज १०४ किमी प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केलाय. 

Read More