Marathi News> टेक
Advertisement

पतंजलिने लाँच केले सिम, १४४ रुपयांत मिळणार २ जीबी डेटा

योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केलीये. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले. 

पतंजलिने लाँच केले सिम, १४४ रुपयांत मिळणार २ जीबी डेटा

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केलीये. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिम कार्ड हे नाव देण्यात आलेय. हे कार्ड पतंजलि आणि भारत संचार निगम लिमिटेड(बीसएनएल) यांनी एकत्रित मिळून लाँच केलेय. दरम्यान, हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. यात तुम्ही १४४ रुपयांचा रिचार्ज केल्यास युझरला २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच या सिमद्वारे पतंजलिच्या उत्पादनांवर १० टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.

या सिममध्ये मिळणार हे फायदे

या सिममध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबचच २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. 

हे सिम सध्या केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठी लाँच करण्यात आलेय. मात्र जेव्हा हे सगळ्यांसाठी लाँच करण्यात येईल तेव्हा या सिम कार्डद्वारे युझरला पतंजलिच्या उत्पादनांवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. 

इतकंच नव्हे तर सिमचा वापर करणाऱ्या युझरला २.५ लाखापर्यंतचा मेडिकल इन्श्युरन्स मिळणार आहे. तसेच ५ लाखापर्यंतचा लाईफ इन्श्युरन्स मिळणार आहे. 

देशाची सेवा करणे हेच आमचे लक्ष्य - रामदेव बाबा

सिम लाँचिंगदरम्यान बोलताना रामदेव बाबा म्हणाले, बीएसएनएल हे स्वदेशी नेटवर्क आहे पतंजलि आणि बीएसएनएलचे देशाची सेवा करणे हेच लक्ष्य आहे.

कंपनीचे लक्ष्य चॅरिटी करणे आहे. आमचे नेटवर्क केवळ स्वस्त डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत नाहीये तर लोकांना हेल्थ आणि लाईफ इश्युरन्सची सुविधाही देत आहे. 

Read More