Marathi News> टेक
Advertisement

Electric Scooter : एका चार्जिंगमध्ये सुस्साट जा,स्वस्तात मस्त ई-स्कूटर, पहा फीचर्स

Electric Scooter  : ही स्कूटर Okinawa iPraise+ आणि Hero Electric Photon सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते.   

Electric Scooter :  एका चार्जिंगमध्ये सुस्साट जा,स्वस्तात मस्त ई-स्कूटर, पहा फीचर्स
Updated: Sep 24, 2022, 07:55 PM IST

Amo Jaunty Plus Electric Scooter : सध्या इलेक्ट्रिक वाहनांना खूप मागणी आहे. हिरो इलेक्ट्रिक ही नंबर वन इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric Scooter) कंपनी राहिली आहे. तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी गेलात तर अनेक ऑपशन्स आहेत. अशीच एक इलेक्ट्रिक स्कूटर AMO Jaunty Plus आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत चांगली रेंज मिळेल. स्कूटरची किंमत 74 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर Okinawa iPraise+ आणि Hero Electric Photon सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. (automobile amo jaunty plus electric scooter see full features and price)  

सिंगल चार्जमध्ये 120 Km धावणार

ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. जॉंटी प्लस स्कूटरमध्ये 60 V/40 Ah Advance Lithium Ion बॅटरी आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. तर दोन तासांत ते 60 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, असा दावा कंपनीचा आहे.  
 
यात क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टीम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म मिळतो. स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाइट्स आणि इंजिन किल स्विच यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. EV मध्ये स्थिर आणि पोर्टेबल बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहेत. Jaunty Plus ई-स्कूटरमध्ये मोबाईल USB चार्जिंग पोर्ट देखील आहे.

3 वर्षांची वॉरंटी 

एएमओ (AMO) इलेक्ट्रिक स्कूटरची 3 वर्षांची वॉरंटी आहे. ही इ स्कूटर पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.