Marathi News> टेक
Advertisement

अॅपल 'मॅकबूक प्रो'ची बॅटरी 'फ्री रिप्लेस' करणार

अॅपलने आपल्या ग्राहकांची नेहमीच काळजी घेतली आहे, त्यामुळे अॅपलचे चाहते वाढत आहेत.

अॅपल 'मॅकबूक प्रो'ची बॅटरी 'फ्री रिप्लेस' करणार

मुंबई : अॅपलने शुक्रवारी मॅकबूक प्रो बॅटरी फ्री रिप्लेस करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या सपोर्टपेजवर म्हटलं आहे, १३ इंचीच्या नॉन टॉच बार 'मॅकबूक प्रो'चे काही युनिट्स बॅटरीमुळे फेल झालेले आहेत. मात्र यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नाही. अॅपलने शुक्रवारी 'मॅकबूक प्रो'ची बॅटरी फ्री रिप्लेस करण्याची घोषणा केली आहे. ज्यात मॅकबूकमध्ये ही अडचण आली आहे, असे मॅकबूक ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ च्या दरम्यान बनवण्यात आले होते. जर तुमच्याकडे मॅकबूक आहे आणि बॅटरी रिप्लेस करण्याच्या लायक आहे किंवा नाही, हे आपला मॅकबूक सिरियल नंबर चेक करून पाहता येणार आहे, यासाठी अॅपलच्या सपोर्ट पेजवर लिंक दिली आहे.

यापूर्वी बॅटरी बदलली असेल तर पैसे परत

जर तुमच्या लॅपटॉपमध्ये ही समस्या दिसून आली, तर तुम्हाला कोणत्याही अधिकृत अॅपल रिपेअर सेंटर, रिटेल स्टोअर अथवा अॅपल सर्व्हिस सेंटरवर लॅपटॉपला घेऊन जावं लागेल, तेथे फ्रीमध्ये तुम्हाला बॅटरी बदलून दिली जाईल. कंपनीने म्हटलं आहे की, ज्या युझर्सने बॅटरी बदलताना पैसे दिले असतील, त्यांना पैसे परत केले जातील.

Read More