Marathi News> टेक
Advertisement

मुंबईतील मुलाने महिंद्रा शोरुमबद्दल केली तक्रार; आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही मुलं...'

मुंबईतील एका चिमुरड्याने महिंद्रा शोरुमबद्दल तक्रार केली आहे. त्याच्या या तक्रारीची दखल महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे.   

मुंबईतील मुलाने महिंद्रा शोरुमबद्दल केली तक्रार; आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही मुलं...'

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा अनेक नव्या उद्योजकांसाठी आदर्श आहेत. यशाच्या शिखरावर असतानाही आजही ते एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर जर एखाद्याने काही सल्ला दिला, तर त्याचा अवलंब करतानाही ते फारसा विचार करत नाहीत. नुकतंच एका चिमुरड्याने महिंद्रा शोरुमबद्दल तक्रार केली असता, आनंद महिंद्रा यांनी त्याची दखल घेत उत्तर दिलं आहे. 

महिंद्रा शोरुममध्ये लहान मुलांसाठी फार सुविधा नाहीत अशी तक्रार एका लहान मुलाने केली आहे. विकास गर्ग नावाच्या एका युजरने 5 मार्चला हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. 

या व्हिडीओत लहान मुलगा बोलत आहे की, "येथे फक्त मोठ्या लोकांसाठीच सर्व काही का असतं? येथे चहा, कॉफी असं सगळं काही आहे. पण इथे मुलांसाठी मात्र काहीच नाही". विकास गर्गने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "सर, महिंद्राचा चाहता असणाऱ्या छोट्या मास्टर अद्विकची ही विनंती आहे. कार खरेदी करताना निर्णय प्रक्रियेत समान हक्क मिळावा अशी त्याची आशा आहे".

fallbacks

आनंद महिंद्रा यांनी विकास गर्गच्या पोस्टची दखल घेतली असून सहमती दर्शवली आहे. सध्याच्या घडीला लहान मुलांचं म्हणणं, मतं यांचंदेखील महत्व आहे हे आनंद महिंद्रा यांनी मान्य केलं आहे. 

"आज, मुलांचं म्हणणं आणि मते कुटुंबीय कोणती कार खरेदी करणार यावर खूप प्रभाव पडतात. अद्विकचं म्हणणंही बरोबर आहे, शोरूममध्ये मुलांना महत्त्व देण्यासाठी आम्ही पुरेसं करत नाही. अद्विकच्या सल्ल्यानुसार काम करण्यासाठी आमच्या टीमला प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे,” असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. 

आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण या पोस्टवर व्यक्त झाले आहेत. एकाने हे फारच चांगलं असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी याच्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. 

"अगदी नम्रतेने सांगायचं झालं तर मी याकडे विशेषाधिकारप्राप्त, श्रीमंत मुलांच्या समस्या म्हणून पाहतो जे कार शोरूमला भेट देणाऱ्या कुटुंबासोबत येतात. कुटुंबाने कोणती कार खरेदी केली याचा निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग घेणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला आशा आहे की या दोन गोष्टींची सरमिसळ होणार नाही," असं एका युजरने म्हटलं आहे. 

Read More