Marathi News> टेक
Advertisement

Airtel लॉन्च केले दोन जबरदस्त प्लॅन्स, मिळणार जिओपेक्षा जास्त फायदा?

एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी २ नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पण एअरटेलने जुने प्लॅन्स नवीन करून लॉन्च केले आहेत.

Airtel लॉन्च केले दोन जबरदस्त प्लॅन्स, मिळणार जिओपेक्षा जास्त फायदा?

नवी दिल्ली : एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी २ नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पण एअरटेलने जुने प्लॅन्स नवीन करून लॉन्च केले आहेत. असे बोलले जात आहे की, हे प्लॅन्स जिओच्या प्लॅन्सना टक्कर देतील. कंपनीने आपल्या दोन मोठ्या प्लॅन्सची व्हॅलिडीटी आणि डेटा वाढवला आहे. 

हे आहेत प्लॅन्स

एअरटेलने ४४८ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ७० दिवसांवरून ८२ दिवस केली आहे.
४४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये डेटाही ७० जीबी ऎवजी ८२ जीबी मिळणार आहे.
प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळणार आहे. कॉलिंग आधीसारखीच मोफत असणार.
५०९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी आता ८४ दिवसांवरून ९१ दिवस असेल.
५०९ रूपयांच्या प्लॅनमध्ये आता ९१ जीबी डेटा मिळणार आहे.
प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा आणि १०० मेसेज रोज मिळणा, यात रोमिंग फ्रि सुद्धा आहेत.

जिओचा प्लॅन

जिओने नुकताच हॅपी न्यू इअर २०१८ या प्लॅनमध्ये ५० रूपयांची कपात केली होती. सोबतच काही प्लॅन्समध्ये डेटा वाढवला होता. जिओने १४९ चा प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यात प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ३० दिवसांची आहे. दावा केला जातोय की, २८ दिवस प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा देणारा हा प्लॅन टेलिकॉम इंडस्ट्रीतील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. 

50%  जास्त फायदा मिळणार

जिओच्या १९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये २८ जीबी ऎवजी ४२ जीबी डेटा मिळणार
३९८ च्या प्लॅनमध्ये ७० जीबी ऎवजी १०५ जीबी डेटा मिळणार
४४८ च्या प्लॅनमध्ये ८४ जीबीच्या जागी आता १२६ जीबी डेटा मिळणार
४९८ च्या प्लॅनमध्ये आधीसारखा १३६ जीबी डेटा मिळणार

Read More