Marathi News> टेक
Advertisement

PUBG नंतर आता BGMI वर बंदी! हे युजर्स डाउनलोड करु शकणार नाहीत गेम

पब्जीवर बंदी आल्यानंतर BGMI ने त्याची जागा घेतली होती

PUBG नंतर आता BGMI वर बंदी! हे युजर्स डाउनलोड करु शकणार नाहीत गेम

BGMI Banned From Google Play Store : लोकप्रिय बॅटल रॉयल गेम (BGMI) कोणतीही अधिकृत सूचना न देता गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोर  वरून काढून टाकण्यात आला आहे. ही बातमी भारतीय खेळाडूंसाठी निराशाजनक असू शकते. त्यामुळे आता अँड्रॉइड  आणि आयओएस युजर्स हा गेम डाउनलोड करू शकणार नाहीत. यापूर्वी भारतात पब्जी (PUBG) ला गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्याची जागा बीजीएमआयने घेतली होती. पण आता हा गेम देखील गुगलने काढून टाकला आहे. हे का घडले हे गेमर्सना अद्याप समजू शकलेले नाही.

गेमर्सना असे वाटत आहे की पब्जीप्रमाणेच त्यावर बंदी घालण्यात आली आहे. युजर्स अद्याप थर्ड पार्टी एपीके वेबसाइटवरून हा गेम डाउनलोड करू शकतात. मात्र, गुगल प्ले स्टोअरवरून हटवल्यानंतर आता गेमर्स भयभीत झाले असून येत्या काही दिवसांत त्यावर पूर्णपणे बंदी घातली जाईल, असे ते गृहीत धरत आहेत.

हा गेम अजूनही अँड्रॉइड युजर्संना डाउनलोड करत येऊ शकतो. परंतु आयफोन वापरणारे गेमर कोणत्याही प्रकारे हा गेम डाउनलोड करू शकत नाहीत. बीजीएमआयला क्राफ्टन इंक या कंपनीने लॉन्च केले होते. त्यांनीच पब्जी मोबाईल गेम बाजारात आणला होता. पब्जीवर बंदी घातल्यानंतर क्राफ्टन इंकने बीजीएमआय गेम बाजारात आणला होता. त्यामध्ये काही बदल झाले होते पण त्यात पब्जीचे फीचर्स देखील समाविष्ट होते. त्यामुळेच हेच हा गेम हटवण्याचे कारण  मानले जाते.

Tencent Lie या चिनी कंपनीने पब्जीची निर्मिती केल्यामुळे भारत सरकारने त्यावर बंदी घातली होती. पब्जी गेल्यानंतर बीजीएमआयमुळे गेमर्सना दिलासा मिळाला होता. मात्र आता  गेमर्सना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. दरम्यान, सरकारी आदेशामुळे तो काढण्यात आला असण्याची शक्यता आहे.

Read More