Marathi News> टेक
Advertisement

22 वर्षांपासून या गाडीने बदललं होतं Mahindra चं नशीब

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची अशी एक गाडी आहे जिने महिंद्राचं नशीब बदलून टाकलं होतं.

22 वर्षांपासून या गाडीने बदललं होतं Mahindra चं नशीब

मुंबई : महिंद्रा कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. मात्र महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची अशी एक गाडी आहे जिने महिंद्राचं नशीब बदलून टाकलं होतं. 22 वर्षांपूर्वी महिंद्राने ही गाडी लाँच केली होती. महिंद्राची ही गाडी म्हणजे Mahindra Bolero...

2000 मध्ये ते 5 लाखांपेक्षाची स्वस्त गाडी

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 2000 मध्ये महिंद्रा बोलेरो लाँच केली होती. त्यावेळी या गाडीची किंमत सुमारे 4.98 लाख रुपये होती. त्या काळात कंपनी या 7 आणि 9 सीटर गाडीमध्ये 2.5 लिटर पियूजिओट डिझेल इंजिन दिलं होतं. या मॉडेलचं पहिलं अपडेट वर्जन 2007 मध्ये लाँच केलं होतं.

2008 मध्ये इंजिन-ऑफ टेक्नॉलॉजी 

2007 मध्ये, कंपनीने बोलेरोच्या लूकमध्ये थोडासा बदल केला होता. पण मोठा बदल 2008 मध्ये आला जेव्हा कंपनीने गाडीचं इंजिन बदललं. तसंच मायक्रो हायब्रीड टेक्नोलॉजीचा वापर केला. ज्यामध्ये गरज नसताना गाडीचं इंजिन बंद केलं जात होतं. 

गाडीमध्ये असे झाले बदल

महिंद्रा बोलेरोचं 2011 आणि 2016 मध्ये अपग्रेडेशन झालं. आता नवीन महिंद्रा बोलेरोमध्ये ड्रायव्हर तसंच समोरच्या प्रवाशांना एअर बॅग मिळणार आहेत.  त्यामुळे चालक आणि सहप्रवाशाची सुरक्षा वाढणार आहे वाढेल. जानेवारी 2022 पासून देशातील सर्व गाड्यांमध्ये ड्युअल एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

सध्या बोलेरोमध्ये 1.5 लिटर एमहॉक75 डिझेल इंजिन आहे. हे 75hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करतं. याशिवाय ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम, एबीएस, एअर कंडिशन सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आलेले आहेत.

Read More