Marathi News> टेक
Advertisement

2022 Hyundai Venue Facelift: नवीन ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

ह्युंदाई इंडियाने वेन्यू फेसलिफ्ट लाँच केले असून या विभागातील स्पर्धा वाढली आहे.

2022 Hyundai Venue Facelift: नवीन ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट लाँच; किंमत आणि  वैशिष्ट्ये जाणून घ्या

2022 Hyundai Venue Facelift: ह्युंदाई इंडियाने वेन्यू फेसलिफ्ट लाँच केले असून या विभागातील स्पर्धा वाढली आहे. कंपनीने 2022 ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत अद्ययावत केली आहे. या गाडीची मारुती सुझुकी ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन सारख्या एसयूव्हीसोबत स्पर्धा असेल. लाँच होण्यापूर्वीच देशभरातील डीलरशिपवर गाडी पोहोचवण्याचं काम सुरू झालं होतं. गाडीची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते.

2022 ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्टमध्ये नवीन फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. याची  रचना जुन्या मॉडेलपेक्षा वेगळी आहे. डीआरएल डिझाइन देखील अपडेट करण्यात आले आहे. नवीन डायमंड कट डिझाईन अलॉय व्हील्स कारमध्ये असणार आहेत. कंपनीने कारच्या मागील बाजूसही बरेच काम केले आहे. संपूर्ण बूटवर नवीन कनेक्टिंग लाईट लाइनसह टेल लॅम्प दिले आहेत. यामुळे त्याचा लूक खूपच स्टायलिश आहे. गाडीत कापा 1.2L एमपीआय पेट्रोल, कापा 1.0L टर्बो जीडीआ पेट्रोल इंजिन आणि U2 1.5 सीआरडीआय डिझेल इंजिन दिलं आहे. यासोबतच फाइव्ह-स्पीड मॅन्युअल, सिक्स-स्पीड मॅन्युअल, सिक्स-स्पीड आयएमटी आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत. इको, स्पोर्ट्स आणि नॉर्मल मोड असे तीन ड्राइव्ह मोड्स कंपनी ऑफर करत आहेत.

अलेक्सा आणि गुगल व्हॉइस असिस्टन्ससह कारचा एसी चालू आणि बंद करण्याची फीचर देखील दिलं आहे. याआधी या सेगमेंटमधील कोणत्याही कारमध्ये असे फीचर नव्हते. याशिवाय कारच्या माहिती प्रणालीमध्ये 10 प्रादेशिक भाषा उपलब्ध आहेत. जर एखाद्या व्यक्तीला ते इंग्रजीमध्ये वापरायचे नसेल तर तो त्याची प्रादेशिक भाषा निवडू शकतो. कारमध्ये पूर्णपणे स्वयंचलित हवामान नियंत्रण प्रणाली दिली आहे.

कारच्या मागील बाजूस एसी व्हेंट्स, रिमोट इंजिन स्मार्ट कीसह स्टार्ट, वायरलेस फोन चार्जिंग, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स पुढील आणि मागील बाजूस, क्रूझ कंट्रोल आणि पुश बटण स्टार्ट सारखी वैशिष्ट्ये कारच्या मागील बाजूस उपलब्ध असतील. यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर प्युरिफायर (क्रेटा सारखे), इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 2 स्टेप-रिक्लिनिंग रीअर सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. यात 6 एअरबॅग दिल्या आहेत.

Read More