Marathi News> टेक
Advertisement

HEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत

या महिन्यापर्यंतच ही ऑफर सुरु राहणार आहे.

HEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत

नवी दिल्ली : Hero Motocorp scooter offers 2020 टॉप टू व्हीलर ब्रँड हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) फेब्रुवारी महिन्यात आपल्या दोन स्कूटरवर जबरदस्त ऑफर देत आहे. यात १३००० रुपयांपर्यंतची बचत करु शकता. कंपनी डेस्टिनी १२५ (Destini 125) आणि प्लेजर प्लस (Pleasure+) स्कूटरवर या महिन्यात स्पेशल ऑफर देत आहेत. ही ऑफर बीएस ४ (BS IV) फ्यूल स्टँडर्ड मॉडेलवर देण्यात येत आहे. ही ऑफर २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत सुरु असणार आहे.

हीरो मोटोकॉर्पच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना ३००० रुपयांचा कॅश बेनिफिट, ८००० रुपये बीएस ६च्या तुलनेत भाववाढीचा फायदा आणि ५००० हजार रुपये एक्सचेंज आणि लॉयल्टी बेनिफिट मिळू शकतो. एवढंच नाही तर ही स्कूटर केवळ ५९९९ रुपयांच्या डाऊनपेमेंटवर खरेदी करता येऊ शकते. यावर स्कूटरवर ५ वर्षांची वॉरंटीही मिळू शकते. 

या स्कूटरवरील ऑफर जाणून घेण्यासाठी ग्राहक, जवळच्या हीरोच्या डिलरशीपमध्ये माहिती मिळवू शकतात. कंपनी ही ऑफर कोणत्याही दुसऱ्या ऑफरमध्ये क्लब करणार नाही. 

Hero Destini 125

Hero MotoCorpने १२५ सीसी असणारी पहिली स्कूटर Hero Destini 125, २०१८ मध्ये लॉन्च केली होती. कंपनीने ही स्कूटर Destini 125 LX आणि Destini 125 VX नावाने या दोन प्रकारात बाजारात आणली होती. 

स्कूटरमध्ये १२५cc सिंगल-सिलेंडर, एयरकूल्ड इंजिन आहे. चांगल्या मायलेजसाठी कंपनीने पहिल्यांदा आपल्या स्कूटरमध्ये आयडल-स्टार्ट-स्टॉप-सिस्टम म्हणजेच i3S सिस्टम देण्यात आलं आहे. 

Hero Pleasure+

कंपनीने alloy wheel आणि sheet metal या दोन प्रकारांत ही स्कूटर गेल्या वर्षी लॉन्च केली होती. हीरो प्लेजर प्लसमध्ये ११०.९cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. प्लेजरचं वजन १०१ किलोग्रॅम असून फ्रन्ट आणि रियरमध्ये १३०mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. 

Read More