Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

किशोर कुमार यांच्या गाण्यावर युजवेंद्रची पत्नी धनश्रीचा 'सुपरडान्स', व्हिडीओ

धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्रीने किशोर कुमार यांच्या गाण्यावर साडीमध्ये डान्स केला आहे. 

किशोर कुमार यांच्या गाण्यावर युजवेंद्रची पत्नी धनश्रीचा 'सुपरडान्स', व्हिडीओ

मुंबई: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा युट्यूब तसेच सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. IPL 2021 सामने UAEमध्ये जाहीर झाल्यानंतर तिने गेल्या वर्षी शूट केलेला दुबईमधील एक व्हिडीओ पोस्ट करून तिथल्या आठवणी जाग्या केल्या होता. आता युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्माने किशोर कुमार यांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्रीने किशोर कुमार यांच्या गाण्यावर साडीमध्ये डान्स केला आहे. तिचे हावभाव तर इतके दिलखेच आहेत की चाहत्यांनी देखील या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. एक लडकी भीगी भागी सी या गाण्यावर तिने केलेला डान्स खूपच सुंदर आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 54 हजार लाईक्स मिळाले आहेत.

अभिनेत्री धनश्री वर्माच्या स्वॅग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. धनश्री वर्मा डान्सर, कोरियोग्राफर आणि युट्यूबर देखील आहे. क्रिकेट चाहते देखील धनश्रीचे व्हिडीओ आवर्जुन पाहतात. धनश्रीला क्रिकेट खूप आवडतं. धनश्रीचे युट्यूबवर 15 लाख सब्सक्राइबर्स आहेत. 

 

Read More