Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Cricket World Cup : 'या' टीमपासून रहा सावध; वर्ल्ड कपविनर युवराज सिंगने दिला टीम इंडियाला गुरूमंत्र!

India national cricket team : वर्ल्ड कपसाठी आता हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. त्याआधी वर्ल्ड कपविनर युवराज सिंहने (Yuvraj Singh) मोठं वक्तव्य केलंय.

Cricket World Cup : 'या' टीमपासून रहा सावध; वर्ल्ड कपविनर युवराज सिंगने दिला टीम इंडियाला गुरूमंत्र!

Yuvraj Singh On World Cup 2023 : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup) आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आता वॉर्मअप मॅचसाठी मैदानात घाम गाळत आहेत. टीम इंडिया (India national cricket team) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फेवरेट असली तरी संघासमोर मोठी आव्हानं असणार आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि वर्ल्ड कपविनर चॅम्पियन युवराज सिंह (Yuvraj Singh) याने टीम इंडियाला गुरूमंत्र दिला आहे. 

युवराज सिंह याने आयसीसी ट्रॉफीचा (ICC Trophy) उल्लेख केला. आयसीसी ट्रॉफी जिंकून बराच काळ लोटला आहे. याआधी आपण दोन आयसीसीच्या फायनल खेळलो आहे. 2021 आणि 2023 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्याला जिंकता आली नाही. मला वाटतंय की टीममधील काही लोकांसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, त्यामुळे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर प्रत्येक खेळाडूला आपलं शरिर पणाला लावून सर्वस्व द्यावं लागणार आहे. वनडे क्रिकेटचा फॉरमॅट टी-ट्वेंटीपेक्षा वेगळा आहे. जर तुम्ही सेमीफानयलमध्ये पोहोचलात तर थेट मोठ्या सामन्यात तुमच्यावर दडपण येईल. म्हणून मला वाटतं की हा दबाव हाताळण्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, असं युवराज सिंह म्हणतो. त्यासाठी टीमने तयार राहिलं पाहिजे, असंही युवी म्हणतो.

फायनलपर्यंतचा प्रवास सोपा असणार नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विश्वचषकात भारतासाठी खडतर आव्हान देऊ शकतात. ऑस्ट्रेलिया नेहमीच मजबूत संघ आहे. त्याच्याकडे दबावाचे सामने जिंकण्याची क्षमता आहे. त्यांना तोड द्यावी लागेल, असं युवराज म्हणतो. त्याचबरोबर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तिन्ही संघाच्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे तिथं टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते, असंही युवराज सिंह म्हणतो.

आणखी वाचा - IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!

दरम्यान, भारतातील बहुतेक विकेट अशा आहेत ज्यावर खूप धावा करता येतात. नोव्हेंबरमध्ये हवामान बदलणार आहे. काही सामन्यांमध्ये तो स्विंग होऊ शकतो, तर संध्याकाळी दव पडू शकतो. भारतीय मैदानात स्पिनर्स मोलाची भूमिका असेल, अनेक सामने दुपारनंतर सुरू होतात. त्यामुळे मधल्या काळात स्पिनर्सच्या 25 ओव्हर गेमचेंजर ठरू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे.

Read More