Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

युवा खेळाडूंची सरस कामगिरी, चारवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आणि चौथ्यांदा विश्वचषक भारताकडे आणला आहे. हा एक विक्रम झालाय.

युवा खेळाडूंची सरस कामगिरी, चारवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम

मुंबई : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. भारताने अंतिम सामन्या ऑस्ट्रेलियावर मात करत हा विजय साकारला. युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चारवेळा विश्वचषक भारताकडे आणला आहे. हा एक विक्रम झालाय.

याआधी यांनी बजाबली चोख कामगिरी

याआधी भारताने 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. त्यानंतर युवा टीम इंडियाने हा सिलसिला कायम ठेवलाय. 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेृत्वाखाली चषका जिंकला. विराट आता टीम इंडियाचा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तर 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. 

fallbacks

दरम्यान, आज चौथ्यांदा युवा टीमने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पाणी पाजत 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात भारतानं  ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला. 

कालरा विजयाचा शिल्पकार 

मनज्योत कालरा विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं नाबाद 102 धावांची मॅचविनिंग खेळी केली. भारतानं या विजयासह चौथ्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. भारतासमोर ऑस्ट्रेलियानं विजयासाठी 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतानं 38.5 षटकातच पूर्ण केलं. 

गोलंदांजांनी विजयाचा पाया रचला

मनज्योतबरोबरच हार्विद देसाईनं नाबाह 47 आणि कर्णधार पृथ्वी शॉनं 29 धावांची महत्त्पूर्ण खेळी केली. तर ईशान पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी, अनुकुल रॉय आणि शिवम मावीनं भेद मारा करत कांगारुंना 216 धावांवर रोखलं. आणि गोलंदांजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. तर फलंदाजांनी विजयाचा कळस चढवला. 

Read More