Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारतासाठी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अधूरंच... टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत

भारतासाठी विक्रम रचायला जात होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच....18 वर्षीय  टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत

भारतासाठी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अधूरंच... टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली : भारतासाठी विक्रम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि तो चॅम्पियन होण्यासाठी निघाला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. भारतासाठी ट्रॉफी आणण्याआधीच काळानं घात केला आणि सगळा खेळ अधूराच राहिला. 

भारतासाठी खेळायला मिळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी आयुष्यातली मोठी संधी असते. तमिळनाडूच्या टॉप टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचं हे स्वप्न पूर्ण होत असतानाच विपरीत घडलं. 

दीनदयालन विश्वा तमीजगा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष टीमचा खेळाडू होता. शिलाँग इथे 83 व्या सीनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी दीनदयालन विश्वाची निवड झाली. 

तो तमिळनाडूहून मेघालयात शिलाँगला जाण्यासाठी निघाला. विमानतळावर सुखरुप उतरला पण शिलाँगला स्पर्धेसाठी पोहोचण्याआधीच काळानं घात केला. ट्रकने विश्वाच्या कारला जोरदार धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार वेगानं येणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि धडक देऊन तो 50 मीटर दरीत कोसळला. या दुर्घटनेत विश्वा गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 

या दुर्घटनेमुळे कुटुंबीय आणि मित्रांवर शोककळा पसरली. नव्या युवा खेळाडूला गमवल्याची भावना क्रीडा विश्वात आहे. 

Very sad to learn that young Table Tennis player from Tamil Nadu, Deenadayalan Vishwa died in an accident at Ri-Bhoi in Meghalaya while on his way to Shillong to participate in the 83rd Senior National Table Tennis Championship. My deepest condolences to his family. RIP pic.twitter.com/eaUweRzdiC

Read More