Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup: ...ते रोहित-विराटही करू शकत नाहीत; वर्ल्डकपच्या तोंडावर हरभजन सिंहचं धक्कादायक विधान

Team India Playing 11 in ODI World Cup : क्रिकेटसंदर्भात टीम इंडियाचे माजी खेळाडू अनेकदा आपली मतं मांडत असतात. यामध्ये आता टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंहने ( Harbhajan Singh ) भाष्य केलं आहे. 

World Cup: ...ते रोहित-विराटही करू शकत नाहीत; वर्ल्डकपच्या तोंडावर हरभजन सिंहचं धक्कादायक विधान

Team India Playing 11 in ODI World Cup : एशिया कपचा फायनल सामना 17 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या स्पर्धेनंतर अवघ्या काही दिवसांनी आयसीसी वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर पासून भारतात वर्ल्डकप ( ODI World Cup-2023 ) खेळवला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. दरम्यान क्रिकेटसंदर्भात टीम इंडियाचे माजी खेळाडू अनेकदा आपली मतं मांडत असतात. यामध्ये आता टीम इंडियाचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादवबाबत माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंहने ( Harbhajan Singh ) भाष्य केलं आहे. 

5 ऑक्टोबरपासून सुरु होणार वर्ल्डकप

यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला आहे. ही आयसीसी टूर्नामेंट 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर वर्ल्डकपचा फायनल सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळणार आहे. टीमचं उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलंय. 

हरभजनचं मोठं विधान

हरभजनच्या ( Harbhajan Singh ) म्हणण्यानुसार, 'माझ्या मते सूर्यकुमार यादव वर्ल्डकपच्या टीममध्ये असला पाहिजे. मी टीम मॅनेजमेंटमध्ये असतो तर त्याला प्लेइंग-11 चा भाग नक्कीच बनवला असता. टीम इंडियाने चांगली कामगिरी करावी अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. मुख्य म्हणजे, सूर्यकुमार एक संपूर्ण पॅकेज आहे. तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, माझ्या मते त्या फलंदाजीसाठी टीममध्ये यापेक्षा चांगला फलंदाज नाही. तो जशी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तशी मला वाटतं नाही विराट, रोहित किंवा संजू सॅमसनही करू शकतील.

हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) पुढे म्हणाला की, 'विराट आणि रोहित या दोघांवरही टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून परतलाय. इशान किशन फॉर्मामध्ये असून केएल राहुल खेळणार की नाही याबाबत अद्याप अजून निश्चितता नाही. यासोबतच हार्दिक पांड्याची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. 

टीममध्ये हे सर्व एकत्र चांगले खेळू शकत असतील तर यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार केएल राहुल किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला पाचव्या क्रमांकावर खेळवता येईल. सूर्यकुमारला संधी मिळाल्यास तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल, असं मत हरभजनने सांगितलं आहे. 

वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Read More