Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी

IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.   

IND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी

IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील ज्या मॅचची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते ती मॅच आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत पाकिस्तान एकमेकांचा सामना करणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघान प्रत्येकी दोन सामने खेळले असून त्या दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यामध्ये विजयासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

या मॅचसाठी भारत आणि पाकिस्तान टीमसोबत चाहत्यांमध्येही उत्साह दिसून येतो आहे. अशात आजचा सामना कोण जिंकणार भारत पाकिस्तानला हरवणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडणार आहे. प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडीत यांनी या मॅचबद्दल भविष्यवाणी केली आहे. आज पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्या, शनि अमावस्या आणि वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनची कुंडली पाहून काही भाकीत केलं आहे. या दोघांच्या कुंडलीत शुभ संकेत देत असल्याचं त्यांचं म्हणं आहे. रोहित शर्माची कुंडली ही कर्क राशीची असून त्याची ग्रह दिशा अतिशय चांगले संकेत देत आहेत. त्या कुंडलीनुसार त्याची प्रगतीचा काळ सुरु झाला आहे. रोहितच्या कुंडलीतील दशम स्थानी सूर्य, चंद्र आणि बुध असं त्रिग्रह योग असल्याने हे यश आणि प्रगतीचं संकेत आहेत. 

इशान किशनची कुंडली ही मीन राशीची आहे. त्याच्या कुंडलीनुसार शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे त्याला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. तर देवगुरु चढच्या राशीत असल्याने गजकेशरी योग तयार झाला आहे. या योगामुळे त्याचा खेळावर चांगला परिणाम दिसून येणार आहे. तर राहू हा सहाव्या स्थानावर आहे. अशात पहिल्या सामन्यात काही ग्रेट खेळला नाही. अशात गुरु आणि राहू यांच्या प्रभावाने इशान किशान चांगला खेळेल असा संकेत आहे. 

तर आजच्या सामन्याबद्दल बोलयचं झालं तर  भारत आणि पाकिस्तान मॅचमध्ये दोघेही संघ उत्तम खेळणार असून भारताचा विजय होईल, असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडीत यांनी केलं आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास  या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More