Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: 'फक्त बॉल मारा आणि...'; सद्गुरूंनी भारतीय संघाला दिला वर्ल्डकप जिंकण्याचा मंत्र

World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातच आध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

VIDEO: 'फक्त बॉल मारा आणि...'; सद्गुरूंनी भारतीय संघाला दिला वर्ल्डकप जिंकण्याचा मंत्र

World Cup 2023 Final : भारतात सुरु असलेल्या वर्ल्डकप 2023 च्या (World Cup 2023) अंतिम सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष्य लागलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) असा महामुकाबला रविवारी रंगणार आहे. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (narendra modi stadium) जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या सामन्यासाठी स्टेडिअमध्ये उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या संघाने देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे म्हटलं आहे.अशातच आध्यत्मिक गुरु सद्गुरू (sadhguru) यांनी भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने एकही सामना न गमावता आयसीसी वर्ल्डकप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये दोन वेळच्या विजेत्या भारताचा सामना 5 वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. संपूर्ण देश भारतीय संघाला पाठिंबा देत आहे. मात्र, प्रत्येकाच्या मनात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय कसा मिळवायचा? हाच प्रश्न आहे. पण या प्रश्नाचे उत्तर आता सद्गुरूंनी दिले आहे. सद्गुरूंच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेला एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने सद्गुरूंना भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी सूचना देण्यास सांगितले. 

"कप जिंकण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बॉल मारा! वर्ल्डकपसाठी तुमच्या मागे उभ्या असलेल्या 1 अब्ज लोकांबद्दल तुम्ही विचार केल्यास, मग तुम्ही बॉल मिस कराल किंवा तुम्ही विश्वचषक जिंकल्यानंतर घडणाऱ्या इतर सर्व काल्पनिक गोष्टींचा विचार केल्यास, बॉल तुमची विकेट काढेल. मग हा विश्वचषक कसा जिंकायचा? याचा विचार करू नका. चेंडू कसा मारायचा? विरोधी संघाच्या विकेट्स कशा काढायच्या. एवढाच विचार करायचा आहे. वर्ल्डकपचा विचार करू नका. अन्यथा तुम्ही वर्ल्डकपमधून बाहेर पडताल.”

याआधी सद्गुरू यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. "कोणीही कोणत्याही निकालासाठी काम करू शकत नाही; तुम्ही फक्त एका प्रक्रियेवर काम करू शकता. आता, प्रक्रिया ही रोजची चालणारी गोष्ट आहे. यश फक्त इतर लोकांच्या नजरेत असते. त्यांना वाटते की तुम्ही यशस्वी आहात; त्यांना वाटते की तुम्ही अयशस्वी आहात. पण मूलत:, तुम्ही जे करत आहात ती प्रक्रिया आहे, बरोबर?" असे सद्गुरू यांनी म्हटलं होतं.

Read More